मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  nagpur food poisoning : नागपूरात महाशिवरात्रीला शिंगाड्याचं पीठ खाल्ल्याने १०० हून अधिक भाविकांना विषबाधा

nagpur food poisoning : नागपूरात महाशिवरात्रीला शिंगाड्याचं पीठ खाल्ल्याने १०० हून अधिक भाविकांना विषबाधा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 10, 2024 08:43 AM IST

nagpur food poisoning : लातूर येथील विषबाधेची (Nagpur news) घटना ताजी असतानाच नागपूर येथून देखील अशीच एक घटना पुढे आली आहे. नागपुरात नागपूरात महाशिवरात्रीला शिंगाड्याचं पीठ खाल्ल्याने १०० हून अधिक भाविकांना विषबाधा झाली असून यातील काही जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे.

नागपूरात महाशिवरात्रीला शिंगाड्याचं पीठ खाल्ल्याने १०० हून अधिक भाविकांना विषबाधा
नागपूरात महाशिवरात्रीला शिंगाड्याचं पीठ खाल्ल्याने १०० हून अधिक भाविकांना विषबाधा

nagpur food poisoning : लातूर येथील विषबाधेची (Nagpur news) घटना ताजी असतानाच नागपूर येथून देखील अशीच एक घटना पुढे आली आहे. नागपुरात नागपूरात महाशिवरात्रीला शिंगाड्याचं पीठ खाल्ल्याने १०० हून अधिक भाविकांना विषबाधा झाली असून यातील काही जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे. ही घटना नागपूरातील हिंगणा, कामठी या दोन तालुक्यातून घडली आहे. विषबाधा झालेल्या नागरिकांना नागपुरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने शिंगाड्याच्या पिठाचे नमुने घेतले असून याची तपासणी करण्यासाठी हे पीठ प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.

Arun Goel Resignation : निवडणूक आयुक्त निवडीवरूनही झाला होता वाद! अचानक राजीनामा देणारे अरुण गोयल आहेत तरी कोण ?

महाशिवरात्री निमित्त हिंगणा आणि कामठी येथे विविधी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपवास आल्याने भावीकांसाठी शिंगाड्याच्या पिठाचे उपवासाचे पदार्थ तयार करण्यात आले होते. हे पिठाची मुदत ही संपली होती. या शिंगाडाच्या पिठापासून तयार करण्यात आलेले फराळाचे पदार्थ भाविकांनी खाल्याने त्यांना अचानक त्रास सुरू झाला. अनेकांना मळमळ, उलट्या, जुलाब आणि चक्कर येऊ लागले. १०० हून अधिक भाविकांना हा त्रास सुरू झाल्याने ग्रामस्थांची धावपळ उडाली. विषबाधा झालेल्या नागरिकांना तातडीने मिळेल त्या वाहनांतून नागपूर येथील विविध दवाखान्यात भरती करण्यात आले.

धक्कादायक! शाळेत खेळतांना दुसरीतील मुलाला आला हृदयविकाराचा झटका; जावेगरच मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैद

ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शहरात आणि ग्रामीण भागात केवळ एका ब्रँडचे सीलबंद शिंगाडा पिठ मिळत असून या पिठामुळे ही विषबाधा झाली असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने दाखल घेतली आहे. शिंगाड्याच्या पिठाचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, हा भेसळीचा प्रकार असून या प्रकानरी कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

त्रास झालेल्या सर्वांनी विकत घेतलेले शिंगाडाचे पीठ एकाच कंपनीचे होते. हे पीठ एक्स्पायर झाले असतांनाही विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. मुदत संपल्यांतरही दुकानदारांनी ते पीठ नष्ट न करता विक्री केल्याने हा गंभीर प्रकार घडला आहे.

IPL_Entry_Point

विभाग