Sai Baba of Shirdi Donation: अनेक लोक नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करतात. राज्यभरातील अनेक तीर्थस्थळांसोबतच नववर्षाच्या सुरुवातीला हजारो भाविकांनी देवदर्शनासाठी शिर्डीच्या साई मंदिरात गर्दी केली होती. नाताळ व नवीन वर्षाच्या सुट्टीनिमित्त लाखो भाविकांनी साई दर्शनासाठी शिर्डीत गर्दी केली होती. राज्यातील अनेक तीर्थस्थळी दर्शन घेऊन भाविकांनी नववर्षाची सुरुवात केली, यावेळी मंदिरात भरभरुन दानही जमा झाले आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांकडून मागील ९ दिवसात तब्बल १६ कोटी ६१ लाख ८० हजार रुपयांचे दान करण्यात आले आहे. हे दान २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत कोट्यवधींचे दान झाले आहे.
वर्षभरशिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश- विदेशातून भाविक येत असतात. त्यातच सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत लाखो भाविकांनी हजेरी लावली. नववर्षानिमित्त भाविकांकडून साई चरणी कोट्यवधींचे भरभरून दान टाकण्यात आले आहे. रोख रक्कम, सोने-चांदी आदी वेगवेगळ्या प्रकारे भाविकांकडून मागील ९ दिवसात तब्बल १६ कोटी ६१ हजार रुपयांचे दान करण्यात आले आहे.
शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. दररोज हजारो भाविक साई दर्शन करत असतात व साईचरणी भरभरून दान करत असतात. रोक रक्कमेसोबतच काही भाविक सोने- चांदीचे दागिनेही अर्पण करतात. नववर्षाच्या स्वागताला साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून साईबाबांना भरभरूनदान देण्यात आले आहे. अजून देखील भाविकांची गर्दी सुरू असून दान अर्पण केले जात आहे. उद्या व परवा शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
नाताळ ते नववर्षदरम्यान म्हणजे २५ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ दरम्यान साधारण ६ लाखांहून अधिक भाविकांनी साई दर्शन घेतले. साईबाबांना अर्पण करण्यात आलेल्या देणगीत दानपेटीत ६ कोटी १२ लाख मिळाले. तर देणगी काऊंटरवर ३ कोटी २२ लाख जमा झाले आहेत. ऑनलाईन देणगी चेक, डीडी, मनी ऑर्डर, डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ४ कोटी ६५ लाखमिळाले. तर ५४ लाख ५० हजार रुपयांचे सोने. ९ लाख ९३ हजार रुपयांची चांदी. सशुल्क देणगी पासच्या माध्यमातून १ कोटी ९७ लाख रुपये मिळाले आहेत. असे सर्व मिळून १६ कोटी ६१ हजार रुपयांचे दान करण्यात आले आहे.
साईबाबांवरील श्रद्धेपोटी लाखो भाविक साईचरणी दानअर्पण करत असतात. त्यामुळे देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानात साईबाबा मंदिराचा समावेश होतो. जून महिल्यात एका साईभक्ताने साईचरणी मोठं दान केले आहे. या भक्ताने तब्बल ४३ लाख रुपयांचा सोन्याचा मुकूट साईचरणी अर्पण केला आहे. या मुकूटाचे वजन तब्बल ६४८ ग्रॅम आहे.
संबंधित बातम्या