Amruta Fadnavis New Post: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडवणीस यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून नेटकऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षीव केला होता. यानंतर अमृता फडणवीस यांनी नुकतेच बर्फात मांडी घालून बसलेले त्यांचे दोन फोटो शेअर केली. त्यावरून त्यांना पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले.
अमृता फडणवीस सोशल मीडियावर कायम त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांच्याबद्दलचे अपडेट देत असतात. सध्या त्या परदेशात असून सुट्टीचा आनंद घेत आहेत. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्या बर्फात मांडी घालून बसलेल्या दिसत आहेत. मात्र, या फोटोवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.
अमृता फडणवीस या नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. याआधीही अमृता फडणवीस यांनी त्यांच्या बिनधास्त आणि हटके लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यावरून ट्रोर्लर्सनी त्यांना अनेकदा ट्रोल केले मात्र, अमृता फडणवीस याची तमा अजिबात बाळगत नाहीत.
अमृता फडणवीस यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी इंन्स्टाग्रामवर आतापर्यंत १ हजार पेक्षा जास्त पोस्ट केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे १ मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत. अमृता फडणवीस यांनी शेअर केलेली कोणतीही पोस्ट काही क्षणातच प्रचंड व्हायरल होते.