Devendra Fadnavis Edited Video : लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडवर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरून संपूर्ण देशात गदारोळ सुरू असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही जणांनी त्यांचा व्हिडिओ एडिट करून ते संविधान विरोधात असल्याचं दाखवलं आहे. याची गंभीर दाखल पोलिसांनी घेतली असून या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाविरोधात काँग्रेसनं अनेक ठिकाणी निषेध मोर्चे व आंदोलनं केली. यावरून भाजप अडचणीत सापडली असतांना आता सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये फडणवीस हे संविधान विरोधी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शुद्धोधन सहजराव, नागपूर काँग्रेस सेवादल, भारत शिंदे, सौरभ सिंह चौहान, मुकेश लवाळे, प्रसाद साळवी, सुरेश काळे, वरद कांकी, अमोल कांबळे, सैयद सलीम, द स्मार्ट २३०के, विष्णू भोटकर अशा व्यक्ती आणि सोशल मीडिया हँडलविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या व्हायरल व्हिडिओची सायबर पोलिसांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी १२ जणांवर व त्यांच्या सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ हा अर्धवट एडिट करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास करून या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर आणखी काही जणांचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच तंत्रीक विश्लेषण करून ट्विटर, फेसबूक व इन्स्टाग्राम व यूट्यूबला देखील या व्हायरल व्हिडिओची माहिती देऊन तो काढून टाकण्यात यावा या बाबत सांगण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या