मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadanvis : ‘तिघांनी मिळून अडीच वर्षं मला संपवण्याचा प्रयत्न केला…पण’; देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

Devendra Fadanvis : ‘तिघांनी मिळून अडीच वर्षं मला संपवण्याचा प्रयत्न केला…पण’; देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 22, 2022 12:50 PM IST

Devendra Fadanvis : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत घेतलेलेल्या गटनेत्यांच्या मेळाव्यात भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. देवेंद्र फडवणीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी टीका केली. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गटनेत्यांच्या बैठकीत सरकारवर चौफेर टीका केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांची ही शेवटची निवडणूक असेल असा घाणाघात त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही तिघांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला होता. पण, तुम्ही ते करू शकला नाही.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर एकनाथ शिंदे, भाजपचे नेते यांनीही उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, तिघांनी मिळून एकत्रपणे अडीच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण संपवू शकला नाहीत. यापुढेही संपवू शकणार नाही असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे यांना आव्हान दिले आहे. एवढेच नाही तर उद्धव ठाकरेंचं मुंबईतील गटनेता मेळाव्यातील भाषण म्हणजे अरण्यरुदन होतं. माझा त्यांना सवाल आहे की आम्ही तर कायदेशीररीत्या निवडून आलो आहोत. मात्र, जेव्हा आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठित तुम्ही खंजीर खुपसला, तेव्हा तुम्ही राजीनामे का नाही दिले? तेव्हा का नाही निवडणुका घेतल्या?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की ही माझी शेवटची निवडणूक ठरेल. पण म्हणतात न की मुद्दई लाख चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में होता है. तुम्ही तिघांनी मिळून २०१९लाही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रपणे अडीच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण तसे होऊ शकले नाही.

तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत निवडून आला नव्हतात. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून आमच्यासोबत निवडून आला होतात. हिंमत होती, तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचे होते, असेही फडणीवस म्हणाले. उद्धव यांचे कालचे भाषण म्हणजे निराशेच भाषण होते, असा खोचक टोमणाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या