मुख्यमंत्रीपदी येताच देवेंद्र फडणवीसांनी घेतला पहिला निर्णय! पुण्यातील 'या' व्यक्तीच्या फाईलवर केली स्वाक्षरी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुख्यमंत्रीपदी येताच देवेंद्र फडणवीसांनी घेतला पहिला निर्णय! पुण्यातील 'या' व्यक्तीच्या फाईलवर केली स्वाक्षरी

मुख्यमंत्रीपदी येताच देवेंद्र फडणवीसांनी घेतला पहिला निर्णय! पुण्यातील 'या' व्यक्तीच्या फाईलवर केली स्वाक्षरी

Dec 06, 2024 07:14 AM IST

CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी पहिला महत्वाचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्रीपदी येताच देवेंद्र फडणवीसांनी घेतला पहिला निर्णय! पुण्यातील 'या' व्यक्तीच्या फाईलवर केली स्वाक्षरी
मुख्यमंत्रीपदी येताच देवेंद्र फडणवीसांनी घेतला पहिला निर्णय! पुण्यातील 'या' व्यक्तीच्या फाईलवर केली स्वाक्षरी

CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी पहिला महत्वाचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरी केली ती वैद्यकीय मदतीच्या फाईलवर. पुण्यातील रुग्णाला त्यांनी ५ लाखांची मदत दिली आहे.

गुरुवारी आझाद मैदान येथे महायुतीचा भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्रीम्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी फडणवीस यांनी पहिला मोठा निर्णय घेतला. त्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.

पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती. त्यानुसार देवेंद्र फडणवीसांनी पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर केली आहे. यामुळे पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून हे पैसे दिले जाणार आहेत.

दरम्यान, सरकार स्थापन झाल्यावर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला अनेक महत्वाच्या सूचना केल्या. या बैठकीत त्यांनी प्रशासनाला वेगाने काम करावं लागेल. कामाची गती वाढवू व अधिक खोलवर जाऊन चांगले निर्णय घेऊन विकासासाठी प्रयत्न करू अशा सूचना फडणवीस यांनी केल्या.

काय म्हणाले फडणवीस ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अधिकाऱ्यांची बोलतांना म्हणाले, आता कसोटी सामना सुरू होणार आहे. त्यामुळे नीट धोऱणात्मक निर्णय घ्यावे लागणार असून या माध्यमातून राज्याचा विकास साधत पुढे न्यायचं आहे. अनेक पायाभूत सुविधा पूर्ण कऱण्यासाठी पावलं उचलायची आहे. दिलेली सर्व आश्वासं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर