दावोसमध्ये इतिहास घडला! रिलायन्स, अ‍ॅमेझॉनचे मोठे करार, १५.९५ लाख रोजगारनिर्मिती, पाहा कोणत्या भागात किती गुंतवणूक?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दावोसमध्ये इतिहास घडला! रिलायन्स, अ‍ॅमेझॉनचे मोठे करार, १५.९५ लाख रोजगारनिर्मिती, पाहा कोणत्या भागात किती गुंतवणूक?

दावोसमध्ये इतिहास घडला! रिलायन्स, अ‍ॅमेझॉनचे मोठे करार, १५.९५ लाख रोजगारनिर्मिती, पाहा कोणत्या भागात किती गुंतवणूक?

Jan 22, 2025 11:06 PM IST

Davos Mous : दावोसमध्ये महाराष्ट्राने आजच्या दुसर्‍या दिवशीपर्यंत१५.७० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या एकूण५४ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून१५.९५ लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचे म्हटले जात आहे.

दावोसमध्ये रिलायन्स, अ‍ॅमेझॉनचे मोठे करार
दावोसमध्ये रिलायन्स, अ‍ॅमेझॉनचे मोठे करार

Davos World Economic Forum : दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्‍या दिवशीपर्यंत १५.७० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून  १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचे म्हटले जात आहे.

आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते ३,०५,००० कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून ३ लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. 

रिलायन्स समूहासोबत ३ लाख ५  हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अ‍ॅमेझॉन करणार मोठी गुंतवणूक -

रिलायन्सनंतर दुसरी मोठी गुंतवणूक ही अ‍ॅमेझॉन करणार असून, ती ७१,७९५ कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून ८३,१०० इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या 2 दिवसांत जे सामंजस्य करार झाले, त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने ११.७१ कोटींचे करार केले असून, एमएमआरडीएने ३.४४ लाख कोटी तर सिडकोने ५५,२०० कोटींचे करार केले आहेत.

सामंजस्य करारांची व कोणत्या भागात होणार गुंतवणूक याची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे:

21) सिएट

क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही

गुंतवणूक : ५००  कोटी

रोजगार : ५००

कोणत्या भागात : नागपूर

 

22) व्हीआयटी सेमिकॉन्स

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : २४,४३७ कोटी

रोजगार : ३३,६००

कोणत्या भागात : रत्नागिरी

 

23) टाटा समूह

क्षेत्र : बहुविध क्षेत्रात

गुंतवणूक : ३०,००० कोटी

 

24) रुरल एन्हान्सर्स

क्षेत्र : रुग्णालयादी सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक

गुंतवणूक : १०,००० कोटी

 

25) पॉवरिन ऊर्जा

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक: १५,२९९ कोटी

रोजगार : ४०००

 

26) ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : १५,००० कोटी

रोजगार : १०००

 

27) युनायटेड फॉस्परस लि.

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : ६५०० कोटी

रोजगार : १३००

 

28) ईरुलर्निंग सोल्युशन्स

क्षेत्र : शिक्षण

गुंतवणूक: २०,००० कोटी

रोजगार : २०,०००

 

29) ऑलेक्ट्रा ईव्ही

क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही

गुंतवणूक: ३००० कोटी

रोजगार : १०००

 

30) फ्युएल

क्षेत्र : पुण्यात स्किलटेक युनिव्हर्सिटीचा मनोदय

राज्यातील ५००० युवकांना एआय, डिजिटल मार्केंटिंग, बिझनेस अ‍ॅनालिटिक्सचे प्रशिक्षण

 

दि. २१ जानेवारीपर्यंत

एकूण गुंतवणूक : ६,२५,४५७ कोटी

एकूण रोजगार : १,५३,६३५

दि. 22 जानेवारी रोजीचे सामंजस्य करार

 

31) रिलायन्स इंडस्ट्रीज लि.

क्षेत्र : पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट

गुंतवणूक: ३,०५,००० कोटी

रोजगार : ३,००, ०००

 

32) ग्रिटा एनर्जी

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : १०,३१९ कोटी

रोजगार : ३२००

कोणत्या भागात : चंद्रपूर

 

33) वर्धान लिथियम

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स (लिथियम रिफायनरी, लिथियम बॅटरी)

गुंतवणूक : ४२,५३५ कोटी

रोजगार : ५०००

कोणत्या भागात : नागपूर

 

34) इंडोरामा

क्षेत्र : वस्त्रोद्योग

गुंतवणूक : २१,००० कोटी

रोजगार : १०००

कोणत्या भागात : रायगड

 

35) इंडोरामा

क्षेत्र : टेक्निकल टेक्सटाईल्स

गुंतवणूक: १०,२०० कोटी

रोजगार : ३०००

कोणत्या भागात : रायगड

 

36) सॉटेफिन भारत

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक: ८६४१ कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

37) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : ४३,००० कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

38) सिलॉन बिव्हरेज

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : १०३९ कोटी

रोजगार : ४५०

कोणत्या भागात : अहिल्यानगर

 

39) लासर्न अँड टुब्रो लि.

क्षेत्र : संरक्षण उत्पादन

गुंतवणूक : १०,००० कोटी

रोजगार : २५००

कोणत्या भागात : तळेगाव

 

40) नेल्सन मिडिया प्रा. लि.

क्षेत्र : आयटी

गुंतवणूक: ४५० कोटी

रोजगार : ११००

कोणत्या भागात : एमएमआर

 

41) इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लि.

क्षेत्र : अंतरिक्ष आणि संरक्षण

गुंतवणूक : १२,७८० कोटी

रोजगार : २३२५

कोणत्या भागात : नागपूर

 

42) एमएसएन होल्डिंग्ज लि.

क्षेत्र : सौर

गुंतवणूक : १४,६५२ कोटी

रोजगार : ८७६०

कोणत्या भागात : नागपूर

 

43) प्रियम सोल्युशन्स प्रा. लि.

क्षेत्र : ड्रोननिर्मिती

गुंतवणूक : ३०० कोटी

रोजगार : ३००

कोणत्या भागात : जालना

 

44) रेनिसन्स सोलार अँड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक: ५००० कोटी

रोजगार : १३००

कोणत्या भागात : विदर्भ, मराठवाडा अथवा उत्तर महाराष्ट्र

 

45) हॅझेरो इंडस्ट्रीज

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : १६,००० कोटी (दोन प्रकल्प)

रोजगार : १०,०००

कोणत्या भागात : बुटीबोरी

 

46) टॉरल इंडिया

क्षेत्र: अ‍ॅल्युमिनियम आणि मेटल्स

गुंतवणूक : ५०० कोटी

रोजगार : १२००

कोणत्या भागात : अहिल्यानगर

 

47) टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : ४३,००० कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

48) हिरानंदानी समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : ५१,६०० कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

49) एव्हरस्टोन समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : ८६०० कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

50) अ‍ॅमेझॉन

क्षेत्र : डेटा सेंटर

गुंतवणूक : ७१,७९५ कोटी

रोजगार : ८३,१००

कोणत्या भागात : एमएमआर

 

51) युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिमिंगहम

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: शाश्वत परिवहन सुविधा

कोणत्या भागात : एमएमआर

 

52) एमटीसी समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: सर्क्युलर इकॉनॉमी पार्क

कोणत्या भागात : एमएमआर

 

53) क्रॉसरेल इंटरनॅशनल

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: वाहतूक सुविधा

कोणत्या भागात : एमएमआर

…………..

22 जानेवारीपर्यंत

एकूण गुंतवणूक : १५.७० लाख कोटी

एकूण रोजगार : १५.७५ लाख

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर