मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गृहमंत्री अदृश्य..राज्य गुंडांच्या तावडीत; फडणवीसांनी राजीनामा द्यावा, घोसाळकरांच्या हत्येनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल

गृहमंत्री अदृश्य..राज्य गुंडांच्या तावडीत; फडणवीसांनी राजीनामा द्यावा, घोसाळकरांच्या हत्येनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 08, 2024 10:59 PM IST

Sanjay Raut on Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबाराच्या घटनेनंतर संजय राऊत यांनी ट्विट करून गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Sanjay Raut on Abhishek Ghosalkar Firing
Sanjay Raut on Abhishek Ghosalkar Firing

शिवसेनेचे नेते व माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा पुत्र तसेच माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. फेसबुक लाईव्ह करून आरोपीने घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या शरीरात घुसल्याने घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोरानेही आपल्या डोक्यात गोळी मारून स्वत:ला संपवलं आहे. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारवर टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वाढलेल्या गुंडगिरीवरून संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी गोळीबाराच्या या घटनेनंतर ट्विट करून गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात. पक्षात प्रवेश देतात. गृहमंत्री अदृश्य झाले आहेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे. अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय. आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत! फडणवीस राजीनामा द्या!

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले की, अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय. मात्र बोरिवलीच्या करुणा रुग्णालयात उपचारादरम्यान अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. तीन गोळ्या शरीरात घुसल्याने अति रक्तस्त्राव होऊन त्यांची प्राणज्योत मालवली.

हल्लेखोर मॉरिस याचाही मृत्यू झालाआहे. अभिषेक यांची हत्या ही पूर्वनियोजित कट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीने अत्यंत थंड डोक्याने त्याला संपवले आहे. फेसबुक लाईव्ह दरम्यान दोघे हसत-खेळत असल्याचे दिसत आहे. आरोपीच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा तणाव दिसत नाही. या प्रकरणाचा तपास दहिसर पोलीस तसेच क्राइम ब्रांच करत आहे.

दरम्यान आणखी एक ट्विट करत संजय राऊत यांनी आरोप केला की, अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मोरिश narohna चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता.मुख्यमंत्री त्याला भेटले. मोरीश याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले! (वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय) आज त्यानें अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला! फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी!

WhatsApp channel