मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Border Dispute: कर्नाटक सीमावादासंबंधी सर्व माहिती अमित शहांपर्यंत पोहोचवणार - देवेंद्र फडणवीस

Border Dispute: कर्नाटक सीमावादासंबंधी सर्व माहिती अमित शहांपर्यंत पोहोचवणार - देवेंद्र फडणवीस

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 06, 2022 10:33 PM IST

maharashtra karnataka border dispute : देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादासंदर्भातील माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल.

फडणवीस-शहा
फडणवीस-शहा

Maharashtra Karnataka Border Dispute : बेळगाव हिरे-बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राचा नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांची कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून नासधूस करण्यात आली. यावेळी गाड्यांच्या नंबर प्लेटवर लाथा मारल्याचे व महाराष्ट्राविरोधी घोषणाबाजी केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

कर्नाटकच्या या कृतीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक होत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: सीमावादाच्या या लढ्यात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कर्नाटक बरोबरच्या सीमावादासंदर्भातील सर्व माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) म्हणाले की, कर्नाटकाने हा सर्व प्रकार थांबवायला हवा. क्रियेला प्रतिक्रिया येतेच. मात्र, असे प्रकार योग्य नाहीत. महाराष्ट्राने संयम दाखवला आहे. जे कुणी वाहने रोखण्यासारखा प्रकार करतील त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील. मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बोललो आहे. या घटनेप्रकरणी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. बोम्मईंनी याबाबतीत कोणालाही पाठिशी घालणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. हा संपूर्ण विषय मी स्वत: देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घालणार आहे. आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला जातो की नाही, हे बघावे लागेल.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या