Devendra Fadanvis : छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस बोलले; म्हणाले…
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadanvis : छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस बोलले; म्हणाले…

Devendra Fadanvis : छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस बोलले; म्हणाले…

Feb 04, 2024 10:17 AM IST

Devendra Fadanvis on Chhagan Bhujbal Resigned : ओबीसी नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात यामुळे खळबळ उडाली असून त्यांच्या या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केले आहे.

Devendra Fadanvis on Chhagan Bhujbal
Devendra Fadanvis on Chhagan Bhujbal

Devendra Fadanvis on Chhagan Bhujbal Resigned : ओबीसी नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी ओबीसींच्या पहिल्या जाहीर सभेला संबोधित करण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे १६ नोव्हेंबर २०२३ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना यावर न बोलण्यास सांगितले होते, असेही त्यांनी म्हटले होते. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच अधिक विस्तारानं सांगू शकतील असे ते म्हणाले.

Maharashtra Weather update: राज्यात थंडी पावसाचा खेळ! तापमानात होणार मोठी घट; असे असेल हवामान

जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गडचिरोलीमध्ये आले असता फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भुजबळ यांच्या रंजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, भुजबळांच्या राजीनाम्याबद्दल केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगू शकतील. आज मी एवढंच सांगेन की आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. किंवा मुख्यमंत्र्यांनीदेखील भुजबळांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.

Pune Crime : विद्येच्या माहेर घरात चाललयं काय?नववीतील अल्पवयीन मुलाने दहावीतील मुलाला शाळेच्या आवारात चाकूने भोसकले

छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी ओबीसींच्या पहिल्या जाहीर सभेला संबोधित करण्याच्या एक दिवस अगोदरच मंत्रिमंडळाच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचीचे सांगितले. भुजबळ यांनी मराठा सर्वेक्षणावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भुजबळ म्हणाले, “३६० कोटी रुपये देऊन खोटा रेकॉर्ड तयार केला जात आहे. नोंदीमध्ये खाडाखोड केली जात आहे. सगेसोयरे म्हणून खोटी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली तर ओबीसींचे आरक्षण संपवून जाईल. मागासवर्गीय आयोगाचा सर्वे सुरु आहे, तो खोटा आहे.”

राजीनाम्याबाबत भुजबळ म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर न बोलण्यास सांगितले होते. "मी यावर मौन बाळगले, पण ओबीसींच्या बाजूने बोलल्याबद्दल भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा असे काही लोक म्हणत आहेत. मी मी शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसींसाठी लढणार असेही भुजबळ म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर