मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधी होणार?, फडणवीसांनी डेडलाईन सांगितली

Devendra Fadnavis : राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधी होणार?, फडणवीसांनी डेडलाईन सांगितली

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 16, 2023 09:31 AM IST

Devendra Fadnavis On Muncipal Corporation Elections : राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये दोन वर्षांपासून प्रशासकराज सुरू आहे. विरोधकांनी निवडणुका घेण्याची मागणी केली असतानाच फडणवीसांनी मोठं विधान केलं आहे.

Devendra Fadnavis On Muncipal Corporation Elections
Devendra Fadnavis On Muncipal Corporation Elections (REUTERS)

Devendra Fadnavis On Muncipal Corporation Elections : कोरोना महामारी आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील बहुतांश महापालिकांच्या निवडणुका चांगल्याच लांबल्या आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी-चिंचवड, ठाणे आणि मुंबईतील अनेक महापालिकांच्या निवडणुकाच होत नसल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता पालिका निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील सरकारसाठी पहिली लढाई ही महापालिका निवडणुकांची आहे. येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात किंवा न्यायालय सांगेल तेव्हा महापालिकांच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळं पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपा-शिवसेना युतीचा भगवा फडकवणार असल्याचं सांगत फडणवीसांनी पालिका निवडणुकींचा महिनाच जाहीर केला आहे. त्यामुळं आता फडणवीसांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्रातील स्थगिती सरकार गेलं असून आता राज्यात गतिशील सरकार सत्तेत आलं आहे. पुण्यासह उपनगरांच्या भागात कोट्यवधी रुपयांच्या योजना सुरू झाल्या आहे. आमच्या सरकारने पुण्यातील मिळकत कराचा प्रश्न सोडवला आहे. येत्या महापालिकेच्या निवडणकीत भाजपाला मुक्ता टिळक आणि गिरीश बापट यांची पोकळी जाणवणार आहे. संघटन हीच भाजपची ताकद असून प्रत्येक घरापर्यंत पोहचण्याचं काम कार्यकर्त्यांकडून होणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point