Devendra Fadnavis Tweet: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. नुकतंच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्हॉट्सअप चॅटचा उल्लेख केला होता. या टीकेला फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.
"देवेंद्र फडणवीस यांनी परिवारावर बोलू नये, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे सुद्धा व्हॉट्सअॅप चॅट बाहेर आलेले आहेत. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल", असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका, असे फडणवीस म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंना खालील पाच मुद्द्यांवर पुस्तक काढण्याचा सल्लाही दिला.
१) सामान्य शिवसैनिकांना वार्यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले?
२) मुंबईला कुणी लुटले?
३) मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले?
४) मराठी माणसाला कुणी ओरबाडले?
५) १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते?
पुढे देवेंद्र फडणावीस म्हणाले की, "आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या...बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…"
"मी पाटण्याला गेलो होतो, पण लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचाव बैठकीला गेले आहेत. देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे सुद्धा व्हॉट्सॅप चॅट बाहेर येत आहेत, आले आहेत. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे. हा माझा परिवार आहे. सूरज, शिवसैनिक आणि हा महाराष्ट्र माझा परिवार आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी कुणी घेत असेल तर तुमचं तुम्हाला माहित. पण मी माझं कुटुंब जपणार. त्यामुळे परिवार बचाओ बोलू नका."
संबंधित बातम्या