मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivsena Dasara Melava : शिवाजी पार्कच्या लढाईत शिवसेनेचा विजय; देवेंद्र फडणवीस म्हणाले..

Shivsena Dasara Melava : शिवाजी पार्कच्या लढाईत शिवसेनेचा विजय; देवेंद्र फडणवीस म्हणाले..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 23, 2022 11:16 PM IST

देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) म्हणाले की,न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्हाला आदर आहे. या निर्णयानुसार प्रशासन काम करेल. न्यायालयात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने भूमिका मांडली होती. मात्र,न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येईल.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

Shivsena Dasara Melava : दादरमधील शिवाजी पार्कवर (शिवतीर्थ) दसरा मेळावा कोण घेणार यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली, व संपूर्ण राज्यासह देशाची उत्सुकता लागलेल्या या लढाईत उद्धव ठाकरे गटाच्या बाजुने न्यायालयाने निकाल दिला. मुंबई उच्च न्यायालयाने आमदार सदा सरवणकर यांचा अर्ज फेटाळून लावत शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे कायदेशील लढाईत शिवसेनेने शिंदे गटावर पहिला विजय मिळवल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान या निकालावर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की,न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्हाला आदर आहे. या निर्णयानुसार प्रशासन काम करेल. न्यायालयात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने भूमिका मांडली होती. मात्र, न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येईल. कोणी नियमांचे उल्लंघन करु नये यासाठी गृहविभाग काळजी घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्याबाबात शिवसेनेच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यानंतर येणाऱ्या अनेक न्यायालयीन लढाया जिंकल्या जातील,असे शिवसेनेकडून म्हटले जात आहे. यावर विचारले असता‘शुभेच्छा आहेत’ या दोनच शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

दसरा मेळाव्यासाठी यंदा प्रथमच शिवसेनेतील दोन गट आमने-सामने होते. त्यामुळे शिवाजी पार्कवर यंदा नेमका कुणाचा दसरा मेळावा होणार यावरुन तर्क-वितर्क लढवले जात होते. दरम्यान या सर्वचर्चांना मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णविराम देत शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाला मेळावा घेण्याची परवानगी दिली. मात्र हे प्रकरण येथेच संपले नसून यात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मैदान ठाकरे गटाला देण्याच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्यापर्यंत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

 

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या