Devendra Fadnavis in Beed: राज्यात सध्या बीडचे राजकारण तापले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते व आमदार धनंजय मुंडे यांच्यावर केले आहे. विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यामुळे मुंडे हे अडचणीत आले आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याला धनंजय मुंडे हे दांडी मारणार असल्याची माहिती आहे. त्याचं कारण देखील पुढं आलं आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यात विविध विकासकामांच्या उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. यासाठी आज मुख्यमंत्री फडणवीस हे बीड दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थिती राहणार नसल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थित राहणार नसल्याची चर्चा होती. आता त्याचे कारण देखील समोर आले आहे. धनंजय मुंडे यांच्या आज डोळ्यांचे ऑपरेशन आहे. या कारणामुळे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या दौऱ्याला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. मोतीबिंदुच ऑपरेशन राहणार असून यानंतर ते ८ दिवस घरीच राहणार आहेत. पंकजा मुंडे व सुरेश धस या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबत एकाच व्यासपीठावर दिसणार आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मुंडे हे कृषी मंत्री असतांना त्यांनी तब्बल ८८ कोटी रुपयांचा घोटाला केल्याचं उघडं झालं आहे. त्यांचे हे आरोप मुंडे यांनी फेटाळून लावले आहेत. मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया यांना इशारा दिला आहे. राज्य सरकारने प्रत्येक गोष्टीची खरेदी करताना अंजली दमानिया यांना विचारुन दर ठरवावा का ? असा सवाल त्यांनी केला आहे. मुंडे यांनी दमानिया यांचा 'बदनामिया' असा उल्लख केला आहे.
संबंधित बातम्या