मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करा, अन्यथा...; दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis : कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करा, अन्यथा...; दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा इशारा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 04, 2022 05:02 PM IST

Devendra Fadnavis on Dasara Melava : उद्या शिवसेनेचा आणि एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चोख बंदोबस्त केला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलतात या कडे सर्वाचे लक्ष लागून आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, कठोर शब्दांत इशारा दिला आहे.

Deputy CM Devendra Fadnavis
Deputy CM Devendra Fadnavis (PTI)

मुंबई : शिवसेना आणि शिंदेसेना यांच्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांवर काय तोफ डागतात या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दोन्ही सभा या एकाच वेळेला आहेत. मोठ्या प्रमाणात दोन्ही कार्यकर्ते येणार असून गैर प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान या दोन्ही मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिला आहे. फडणवीस म्हणाले, कायद्याच्या चौकटीत राहून भाषने व्हायला हवी. भाषण करताना जर कायदा मोडला तर कायदा आपले काम करेल असे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांचा हा इशारा उद्धव गटासाठी आहे असे बोलले जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर तर एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा होणार आहे. दोघांनीही जय्यत तयारी मेळाव्याची केली आहे. मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था नीट राखली जाईल या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन्ही मेळावे हे शांततेत पार पाडले जातील यासाठी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दोन्हीकडील कार्यकर्ते देखील कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणार नाही यासाठी यासाठी प्रयत्न करतील अशी अशा देखील त्यांनी व्यक्त केली. काही घटक महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांनी या गर्दीचा फायदा घेऊ नये, याकडे आमचे चोख लक्ष राहणार आहे. कायद्याच्या पलीकडे जाणून कोणी व्यक्तव्य केली तर कायदा आपले काम करेन, असा इशारा देखील फडणवीस यांनी दिला आहे. राजकारणात एकमेकांवर टीका टिपण्णी होत असते. मात्र, त्याची देखील एक पातळी असते. ही पातळी कुणी सोडणार नाही अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, नाना पटोले यांच्या व्यक्तव्यावर बोलतांना फडणवीस म्हणाले. नाना पटोले चुकीची वक्तव्य करत असतात. ते चर्चेत राहण्यासाठी अशी विविध प्रकारची वक्तव्य करत आहेत. काहीतरी उलट सुलट बोलले की ते दिवसभर चालते. मग त्याच्यावर कोणीतरी प्रतिक्रिया देते. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला मी महत्व देत नाही असे फडणवीस म्हणाले.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग