Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्यात आज आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याच्या मुख्यमत्र्यांनी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर पोहोचले आहेत. दोघांची भेट झाली असून नेमकी त्यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील निवडणुकीवर भाष्य केलं होतं. यात त्यांनी निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यात मुख्यमंत्री व राज ठाकरे यांची भेट झाल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उद्या आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दाखल झाले आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांची ही पहिलीच भेट मानली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ११ वाजता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट ॲंड गाईड हाॅलमधील शिवाजी पार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. यासाठी ते या ठिकाणी गेले होते. दरम्यान या कार्यक्रमापूर्वी फडणवीस हे राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थावर पोहोचले.
राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं. दोघांमध्ये तब्बल २० मिनिटे चर्चा झाली. येत्या काही दिवसांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्यात दोघांची भेट झाल्यामुळे नेमकी काय राजकीय खिचडी शिजत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीवर भाष्य केलं होतं. त्यांनी निवडणूक जिंकली तरी कुणी जल्लोष करत नसल्याचं म्हटलं होत. त्यात अजित प्पावर यांना ४२ जागा मिळाल्या कशा असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता. त्यात अजित पवार यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला स्वतःच्या मुलाला निवडून आणता आले नाही असे पवार यांनी म्हटलं होत.
संबंधित बातम्या