पिंपरी चिंचवडमध्ये सुरु होत असलेल्या १०० व्या नाट्यसंमेलनात देवेंद्र फडणवीसांनी जोरदार टोलेबाजी करत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तिसरी घंटा वाजली की नाटक सुरु होते, राजकारणातही तसंच आहे. आमची तिसरी घंटा म्हणजे आचारसंहिता लागते ती वेळ. तेव्हा आम्ही पोझिशन घेतो. एक गोष्ट खरी आहे कि, चांगल्या तालमी केल्यास कलावंताना रसिकांचा आशीर्वाद मिळतो. तसेच आमचेही आहे.
जे नुसतीच नाटके करतात, त्यांना लोक घरी बसवतात. २०१९ ला एक प्रयोग झाला. कट्यार काळजात नाही, तर पाठीत घुसली. त्यानंतर आम्हीही प्रयोग केला, आता होती गेली कुठे? , असे प्रयोग होतच असतात, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंचे नाव न घेता लगावला.
पुण्यात१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत जोरदार राजकीय फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी मराठी नाट्य रंगभूमीचा समृद्ध इतिहास सांगितला.
देवेंद्र फडणवीस यांनी मराठी नाट्याची आणि मराठी कलाकारांची दीर्घ परंपरा सांगत त्यांनी मराठी नाटकाला अण्णासाहेब पटवर्धनांनी केशराच्या शेतीची उपमा दिली. कारण मराठी नाट्य परंपरेला नाटककार, कलाकारांनी मोठे केले असल्याचे आपल्या देशात मराठी रंगभूमीसारखी समृद्ध परंपरा कुठेच दिसत नसल्याचे सांगत त्यांनी सर्व कलाकारांचेही कौतुक केलं.
प्रेक्षकांच्या निकट जो असतो तोच खरा अभिनेता असतो. पूर्वी राजकीय नेत्यांना संमेलनात बोलावले की, टीका व्हायची पण आता चित्र बदलले आहे. आर्टीर्फिशियल इंटीलिजन्स कडे संवेदनशिलता नाही. कितीही आर्टीर्फिशियल इंटीलिजन्स आलं तरी संगीत, नाट्य, कला यावर परिणाम होणार नाही.