मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis On NCP : “अजितदादांना राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ चिन्ह…”, देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन

Devendra Fadnavis On NCP : “अजितदादांना राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ चिन्ह…”, देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन

Feb 06, 2024 10:03 PM IST

Devendra Fadnavis On Election Commission Result : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांना बहाल केले आहे. आयोगाच्या या निकालावर दुसरे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

devendra Fadanvis on ajit pawar
devendra Fadanvis on ajit pawar

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी कुणाची? याचा फैसला सुनावला आहे. निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत मोठा निकाल देत अजित पवार गटाला झुकते माप दिले आहे. हा निकाल म्हणजे शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांना बहाल केले आहे. यावर आता दुसरे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाराष्ट्रवादी पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यतादिली आहे. मी त्यांचे व त्यांचे सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याची गोष्ट २ जुलै २०२३ या दिवशी समोर आली होती. अजित पवार यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान देत राष्ट्रवादी पक्षावरही दावा सांगितला होता. आज निवडणूक आयोगानेअजित पवार गट हीच खरीराष्ट्रवादी पक्षअसल्याचानिर्णय दिला आहे.

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतील फुटीचे प्रकरणही निवडणूक आयोगात गेले होते. गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचं प्रकरण प्रलंबित होतं. गेल्या सहा महिन्यांत याप्रकरणी १० सुनावण्या पार पडल्या. या प्रत्येक सुनावणीत शरद पवार स्वत: जातीने हजर होते.

राष्ट्रवादीचे दोन्ही गट अजित पवार व शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे सर्व कागदपत्रे सादर केली होती. अखेर अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्ह देण्यात आले आहे. त्याचबरोबर आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नवीन नावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४