मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जी. एन. साईबाबा प्रकरणी न्यायालयाचा निकाल शहीदांच्या कुटुंबीयांसाठी दुर्दैवी - फडणवीस

जी. एन. साईबाबा प्रकरणी न्यायालयाचा निकाल शहीदांच्या कुटुंबीयांसाठी दुर्दैवी - फडणवीस

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 14, 2022 09:50 PM IST

फडणवीस म्हणाले की,जी. एन. साईबाबाप्रकरणी आजचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल हा शहीदांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनकआहे.

जीएन साईबाबा व देवेंद्र फडणवीस
जीएन साईबाबा व देवेंद्र फडणवीस

नागपूर -दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांची नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधाच्या आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की,जी. एन. साईबाबाप्रकरणी आजचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल हा शहीदांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनकआहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री नागपूर येथे पत्रकारांशी बोलतानाही प्रतिक्रियादिली.

साईबाबा प्रकरणी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, नक्षलवाद्यांशी लढताना ज्यांना आपला जीव गमवावा लागतो किंवा या लढ्यातील जे पोलीस, जवान शहीद होतात, त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा निकाल अतिशय धक्कादायक आणि निराशाजनक आहे. या निकालाविरोधात आम्ही तातडीने सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ज्याच्याविरोधात भक्कम पुरावे आहेत, त्याला केवळ विलंबाने खटल्याची परवानगी मिळाली, या एका तांत्रिक कारणामुळे सोडून देणे, हा त्या शहीद कुटुंबांप्रति अन्यायकारक आहे. हे आम्ही सारे सर्वोच्च न्यायालयात योग्यप्रकारे मांडू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.  या निकालामुळे त्या कुटुंबीयांना काय वाटत असेल, याचा विचार मी वारंवार करतो आहे, असे फडणवीस म्हणाले.

२०१४ साली नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांखाली दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०१७ साली गडचिरोली न्यायालयानं नक्षलवादी चळवळींना पाठिंबा देत देशविरोधी कारवायांत सहभाग असल्याचा ठपका ठेवत जीएन साईबाबा यांच्यासह पाच अन्य आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

WhatsApp channel

संबंधित बातम्या