Kalyan Railway Station News : ठाणे जिल्ह्यातील कल्याण रेल्वे स्थानकात तब्बल ५४ डिटोनेटर सापडल्यानं खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी संशयास्पद सामुग्री ताब्यात घेतली आहे.
कल्याण रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर १ च्या बाहेरील बाजूस एक बेवारस बॅग मिळून आली. संशय आल्यामुळं याबाबत पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बेवारस बॅगेची तपासणी केली असता त्यात ५४ डिटोनेटर आढळून आले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिटोनेटर हे स्फोट घडवून आणण्यासाठी वापरले जातात. इतक्या मोठ्या प्रमाणात हे डिटोनेटर रेल्वे स्थानकात कसे आले? यामागे नेमकं कोण आहे? या सगळ्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी ही माहिती दिली.
संबंधित बातम्या