मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Detergent Powder Used For Washing Currants In Sangli Stock Seized

बेदाणा खाताय..? तर ही बातमी वाचा, ‘या’ कारणामुळे सांगलीत साडेसात लाखांचा बेदाणा जप्त

currants
currants
Shrikant Ashok Londhe • HT Marathi
Mar 27, 2023 11:54 PM IST

Detergent used for washing currants : बेदाण्याला चकाकी येण्यासाठी बेदाणा चक्क कपडे धुण्याच्या पावडरचा (डिटर्जेंट) वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला

द्राक्ष व बेदाणा उत्पादनासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे. बेदाण्यात भेसळ करण्याचा प्रकार वारंवार समोर येत असतो मात्र बेदाण्याला चकाकी येण्यासाठी बेदाणा चक्क कपडे धुण्याच्या पावडरचा (डिटर्जेंट) वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला तसेच सात लाख ६३ हजाराचा बेदाणा जप्त करण्यात आला. 

ट्रेंडिंग न्यूज

सांगली जिल्ह्यामध्ये सध्या बेदाणा उत्पादनाचा काळ असल्याने नवीन बेदाणा वॉशिंग व ‍रिपॅकींग सेंटर कार्यरत झाली आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने कुपवाड एमआयडीसीतील विजय संजय सावंत यांच्या मालकीच्या  मे. ओमी सेल्स कॉर्पोरेशन, रंजीत शिवाजी मुळीक यांच्या मालकीच्या मे. बाबा ड्राय फ्रुटस व अशोक चौगुले यांच्या मालकीच्या मे. चौगुले ट्रेडींग या तीन बेदाणा वॉशींग व रिपॅकींग सेंटरची तपासणी केली.

या तपासणी दरम्यान या सेंटरना परवाना नसल्याचे व वॉशींग सेंटरमध्ये अस्वच्छता असल्याचे आढळले. मे. ओमी सेल्स कॉर्पोरेशन या पेढीमध्ये बेदाणा वॉशींग करीता डिटर्जेंट पावडर वापरली जात असल्याचे आढळल्याने सदर पेढीमधून बेदाणा व डिटर्जेंट पावडर यांचे नमुने तपासणासाठी घेऊन ७ लाख ६७ हजार २१० रूपये किंमतीचा बेदाण्याचा उर्वरीत ४ हजार ५१३ कि.ग्रॅ.  बेदाणा साठा जप्त करण्यात आला. 

पथकाला सांगली ट्रेडींग कंपनी विना परवाना व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच विक्री करीता साठविलेल्या बेदाणा पॅकींग लेबलवरती आवश्यक मजकूर नसल्याचे आढळल्याने सदर पेढीस व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. श्री दत्त कोल्ड स्टोरेज ही पेढी देखील विना परवाना व्यवसाय करीत असल्याचे व मुदतबाह्य अन्न पदार्थांचा साठा साठविल्याचे आढळल्याने कीड लागलेली पेंडखजुर या अन्न पदार्थांचे ५ कि.ग्रॅ. चे ११० बॉक्स नष्ट करण्यात आले. या पेढीस व्यवसाय ‍ थांबविण्याची नोटीस देण्यात आली आहे.

WhatsApp channel