मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘टीव्हीवर पाहून निर्णय कसा घेऊ?’ विधानसभा उपाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका
Deputy speaker of Vidhansabha Narhari Zirwal
Deputy speaker of Vidhansabha Narhari Zirwal
23 June 2022, 8:17 AM ISTHT Marathi Desk
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 8:17 AM IST
  • शिवसेना विधीमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांना हटवून त्यांच्या जागी शिवडी येथील आमदार अजय चौधरी यांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मला पत्र लिहिले होते.

शिवसेना विधीमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांना हटवून त्यांच्या जागी शिवडी येथील आमदार अजय चौधरी यांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मला पत्र लिहिले होते. एकनाथ शिंदे यांची नियुक्ती सुद्धा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्राद्वारेच करण्यात आली होती, अशी माहिती विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पत्रकारांना दिली.

ट्रेंडिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ पक्ष नेतेपदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतरसुद्धा शिंदे यांनी त्या पदावर आपला दावा केला आहे. शिवसेना विधीमंडळ पक्षाचा नवा नेता अजय चौधरी असताना शिंदे यांनी स्वतःहून पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची हकालपट्टी केली. त्यांच्या जागी सध्या शिंदेंसोबत गुवाहाटीत हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेले कोकणातील महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांची नियुक्ती जाहीर केली. परंतु आपण मुख्यमंत्र्यांच्या पत्रानुसार एकनाथ शिंदे यांच्या जागी आमदार अनिल चौधरी यांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती केली असल्याचं नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलं. भरत गोगावले यांच्या नियुक्तीसंदर्भात एकनाथ शिंदे यांचे पत्र विधानसभा अध्यक्षाच्या कार्यालयाला मिळाले असून आवक विभागाने त्याची नोंद घेतली असल्याचे झिरवळ म्हणाले.

एकनाथ शिंदेंसोबत टीव्हीवर आमदार दिसताएत, प्रत्यक्षात कुठय?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील बहुसंख्य आमदार असल्याचा दावा केला जातोय. परंतु ते आमदार फक्त टीव्हीवर दिसत आहेत. टीव्हीवर काय दिसतय त्यावरून मी एखादा निर्णय घेऊ शकत नाही, असं नरहरी झिरवळ यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन तृतियांश आमदार असतील किंवा नसतील हा सध्या माझ्यासमोर प्रश्नच नसल्याचं झिरवळ म्हणाले.

शिंदे यांच्यासोबत किती आमदार आहेत, त्याचा अभ्यास मी करणार. तेव्हा शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांंना प्रत्यक्ष बोलवावं लागेल किंवा कसं याचाही निर्णय घेतला जाईल असं झिरवळ म्हणाले.

झिरवळ यांनी उपस्थित केला आमदार नितीन देशमुख यांचा मुद्दा

गुवाहाटीहून शिंदे गटामधून निसटून व्हाया गुवाहाटी महाराष्ट्रात परत आलेले शिवसेनेचे अकोला जिल्ह्यातील आमदार नितीन देशमुख यांची झिरवळ यांनी यावेळी पत्रकारांना आठवण करून दिली. आपल्याला जबरदस्तीने सूरतला नेण्यात आलं होतं. तिथून गुवाहाटीला घेऊन गेले. मात्र गुवाहाटीहून आपण कशीबशी सुटका करून परत आलो, असं नितीन देशमुख यांनी सांगितलं होतं.