उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगवान शंकरावर ‘देवाधी देव’ हे शिवगीत लिहिले असून ज्येष्ठ गायक व संगीतकार शंकर महादेवन आणि अमृता फडणवीस यांनी त्या गाण्याला स्वरबद्ध केले आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर शुक्रवारी यागीताचे लोकार्पण करण्यात आले. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ‘देवाधी देव महादेव’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सध्या सोशल मीडियावर फडणवीसांच्या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांतलं फडणवीसांनी लिहिलेलं हे दुसरं गाणं आहे.
देशात व राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी हे शिवगीत लिहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे या गीताची माहिती दिली.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘देवाधी देव महादेव’ गाण्याची जोरदार चर्चा रंगली होती. ‘शिवसंभो, नीलकंठ तू अनादी....देवाधी देव महादेव...’ असे या गाण्याचे बोल आहे. गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत हे गाणं जवळपास ४० लाख लोकांनी पाहिले आहे. तर ४१ हजारांहून अधिक युजर्सने गाण्याला लाईक केले आहे.भगवान शिवशंकर यांच्याबद्दलच्या स्तुती आणि भक्तीचे शब्द यात आहेत.
प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेवेळेही फडणवीसांनी प्रभू श्रीरामावर एक गाणं लिहिलेलं होतं. त्या गाण्याचे बोल ‘राम नाम’ असे होते. हे गाणं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं होतं. तर, अमृता फडणवीस यांनी हे गाणं गायलं होतं. तर महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक अजय- अतुल यांनी ह्या गाण्याची निर्मिती केली होती. आता प्रभू श्री रामाच्या गाण्यानंतर शिवगीत लोकप्रिय होत आहे. त्यापूर्वी जागो हिंदू हे गाणे फडणवीसांनी सभेत गायिले.