Panvel Municipal Corporation: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणीपुरवठ्याच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पीएमसी क्षेत्रातील पाण्याची समस्या तातडीने सोडवण्यासाठी गेल्या आठवड्यात सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली.
पीएमसीची स्थापना होऊन जवळपास सहा वर्षे उलटली. मात्र, तरीही पनवेल महापालिका क्षेत्रांतर्गत नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी नागरी संस्थेला प्रामुख्याने सिडको, एमआयडीसी, जलसंपदा विभागावर अवलंबून राहावे लागते. या प्रशासनाकडून दिरंगाई झाल्यास महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यावर सर्वाधिक परिणाम होतो. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईसारख्या मोठ्या समस्याला सामोरे जावा लागते.
यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पाताळगंगा नदीतून दररोज १० लाख लिटर आणि डोलवल धरणातून दररोज ५०० दशलक्ष लिटर पाणी आरक्षित करण्याच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याचा प्रस्ताव फडणवीस यांनी मांडला. त्याचबरोबर एमजेपी अंतर्गत न्हावा शेवा टप्पा-३ चे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे फडणवीस यांनी अश्वासन दिले. उन्हाळ्यात नवीन पंप यंत्रणा कार्यान्वित करून फेब्रुवारीअखेर प्रतिदिन २५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
Panvel Municipal Corporation: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणीपुरवठ्याच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पीएमसी क्षेत्रातील पाण्याची समस्या तातडीने सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केल्यानंतर गेल्या आठवड्यात सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली.
पीएमसीची स्थापना होऊन जवळपास सहा वर्षे उलटली. मात्र, तरीही पनवेल महापालिका क्षेत्रांतर्गत नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी नागरी संस्थेला प्रामुख्याने सिडको, एमआयडीसी, जलसंपदा विभागावर अवलंबून राहावे लागते. या प्रशासनाकडून दिरंगाई झाल्यास महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यावर सर्वाधिक परिणाम होतो. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईसारख्या मोठ्या समस्याला सामोरे जावा लागते.
यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पाताळगंगा नदीतून दररोज १० लाख लिटर आणि डोलवल धरणातून दररोज ५०० दशलक्ष लिटर पाणी आरक्षित करण्याच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याचा प्रस्ताव फडणवीस यांनी मांडला. त्याचबरोबर एमजेपी अंतर्गत न्हावा शेवा टप्पा-३ चे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे फडणवीस यांनी अश्वासन दिले. उन्हाळ्यात नवीन पंप यंत्रणा कार्यान्वित करून फेब्रुवारीअखेर प्रतिदिन २५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांच्यासह सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन शर्मा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णा आणि पीएमसी आयुक्त गणेश देशमुख आणि नगरविकास पाणीपुरवठा सचिव संजय खंदारे आदी उपस्थित होते.
संबंधित बातम्या