Devendra fadnavis: “गद्दारांचं सरकार पडले, राज्यात खुद्दारांचे सरकार”, फडणवीसांचे ‘मविआ’वर टीकास्त्र
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra fadnavis: “गद्दारांचं सरकार पडले, राज्यात खुद्दारांचे सरकार”, फडणवीसांचे ‘मविआ’वर टीकास्त्र

Devendra fadnavis: “गद्दारांचं सरकार पडले, राज्यात खुद्दारांचे सरकार”, फडणवीसांचे ‘मविआ’वर टीकास्त्र

Feb 11, 2023 07:10 PM IST

BJP Nashik Meet : नाशिकमध्ये आयोजित भाजप कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

 देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

नाशिक – नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यात संबोधन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. गद्दारांचे सरकार खाली पडले तर महाराष्ट्रात आता खुद्दारांचे सरकार आहे. गेल्या अडीच वर्षात विकास कार्य ठप्प होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीचं अख्खं सरकार मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होते. शिंदेंच्या नेतृत्वाखाली राजकारणातील २०-२० सामना आम्ही नक्कीच जिंकू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, राज्यात आता गद्दारांचे नाही, तर खुद्दारांचे सरकार आहे. जनतेचा विश्वासघात करुन महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं होते. त्यामुळेच ते आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. आमचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेलच, पण पुन्हा दीडपट संख्या घेऊन परत येईल. आम्ही २०-२० ची मॅच सुरु केली आहे, २०२४ ला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मॅच जिंकणार. आता फक्त जनतेसाठी काम करायचं, मला काय मिळेल याचा विचार करायचा नाही, असा महत्त्वाचा सल्लाही फडणवीसांनी भाजप नेते-पदाधिकाऱ्यांना दिला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या