मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Assembly Session : “तुम्ही मंत्री असाल तर तुमच्या घरी”, नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना खडसावलं

Assembly Session : “तुम्ही मंत्री असाल तर तुमच्या घरी”, नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना खडसावलं

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 18, 2022 05:24 PM IST

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Assembly monsoon session) दुसऱ्या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधारी पक्षात चांगलीच खडाजंगी उडाली.

नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना खडसावलं
नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना खडसावलं

मुंबई – विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Assembly monsoon session दुसऱ्या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधारी पक्षात चांगलीच खडाजंगी उडाली. पावसाळी अधिवेशनामध्ये आज शिवसेना (shivsena) आणि शिंदे गट (shinde group) आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांना उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी चांगलेच सुनावले. 'तुम्ही मंत्री असाल तर घरी' असं म्हणत विधानपरिषदेतच त्यांना खडसावले.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात चांगलीत खंडाजंगी झाली.  तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल, हे सभागृह आहे, तुम्ही खाली बसा, अशा शब्दांत नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना खडसावलं. शिक्षकांच्या निधीबाबत चर्चा सुरू असताना गुलाबराव पाटील सभागृहात उभे राहून बोलत होते, त्यानंतर ही खडाजंगी पाहायला मिळाली आहे.

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला, पण त्यांनी आपली बाजू मांडण्याऐवजी अनिल परब यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली. प्रश्नांचं उत्तर देण्याऐवजी ते मागच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करू लागले, यामुळे नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना खाली बसण्याची विनंती केली. मात्र, गुलाबराव पाटील आक्रमक होऊन बोलतच राहिले, यामुळे नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना सुनावलं आहे.

मंत्री महोदय आपण ताबोडतोब खाली बसा, ही बोलण्याची पद्धत नाहीये, तुमच्या विभागाचा विषय काढलेला नाहीये, मी इथे तुम्हाला ताकीद देतेय, केसरकरांच्या शिक्षण विभागाचा प्रश्न आहे, मागच्या कॅबिनेटमध्ये कोण काय करत होतं? हा मुद्दा इथे कशाला काढता? तुम्ही ताबोडतोब खाली बसा. सभागृहात वागायची ही पद्धत नाही. 

यावेळी गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर देताना “मी मंत्री आहे!” असं सांगितलं. यावर नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना चांगलंच सुनावलं. “तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल, सभागृहात बोलण्याची ही पद्धत नाही, तुम्ही ताबडतोब खाली बसा, छातीवर हात बडवून काय बोलता? तुम्ही ताबडतोब खाली बसा…” अशा शब्दांत नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं आहे.

IPL_Entry_Point