Delhi Airport News : दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण अपघात, टर्मिनल १ चे छत कोसळून एक ठार; ६ जखमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Delhi Airport News : दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण अपघात, टर्मिनल १ चे छत कोसळून एक ठार; ६ जखमी

Delhi Airport News : दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण अपघात, टर्मिनल १ चे छत कोसळून एक ठार; ६ जखमी

Published Jun 28, 2024 10:18 AM IST

Indira Gandhi international airport terminal 1 roof collapsed : दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. विमानतळाच्या टर्मिनल-१ चे लोखंडी छत कोसळले असून यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमान तळावर भीषण अपघात, टर्मिनल १ चे छत कोसळून एक ठार; ६ जखमी
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमान तळावर भीषण अपघात, टर्मिनल १ चे छत कोसळून एक ठार; ६ जखमी

Indira Gandhi international airport terminal 1 accident : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी मोठा अपघात झाला. विमानतळाच्या टर्मिनल-१ च्या लोखंडी छताचा काही भाग कोसळला. यामुळे अनेक गाड्यांचा चुराडा झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना सकाळी ५.३० च्या सुमारास घडली. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-१ वर टर्मिनल वनच्या बाहेरील लोखंडी खांबांना सपोर्ट देऊन उभे  केलेले लोखंडी  छत अचानक कोसळले. या अपघातात छताला आधार देण्यासाठी वापरलेले जड लोखंडी खांब  टर्मिनलबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांवर कोसळल्याने यामध्ये गाड्यांचे  नुकसान झाले आहे. छत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. शुक्रवारी दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून या पावसादरम्यान हा अपघात झाला. या घटनेमुळे विमानतळावर मोठा गोंधळ उडाला.

टर्मिनल-१ वरील सर्व उड्डाणे स्थगित

या घटनेबाबत दिल्ली विमानतळाचे प्रवक्ते म्हणाले, 'आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल १ च्या जुन्या निर्गमन फोरकोर्टमधील छताचा काही भाग पहाटे पाचच्या सुमारास कोसळला. या अपघातात लोक जखमी झाले असून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. येथील विमानतळ कर्मचाऱ्यांनी घटना घडल्यावर तातडीने बाधित लोकांना सर्व आवश्यक मदत आणि वैद्यकीय मदत देऊन तातडीने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात भरती केले. या घटनेमुळे, टर्मिनल १ वरून सर्व विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चेक इन काउंटर बंद करण्यात आले आहेत.

मंत्री मंत्री घटनास्थळी रवाना

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री स्वत: या विमानतळावर घडलेल्या दुर्घटणेकडे लक्ष ठेऊन आहेत. मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी ट्विटरवर पोस्ट केली की, 'दिल्ली विमानतळाच्या टी १ वर छत कोसळण्याच्या घटनेवर लक्ष ठेवून असून घटनास्थळी बचाव पथके काम करत आहेत. तसेच, विमान कंपन्यांना T-1 वर सर्व बाधित प्रवाशांना मदत करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर