Puja Khedkar Case : पूजा खेडकरला हायकोर्टाचा झटका, अटकपूर्व जामीन फेटाळला,कधीही होऊ शकते अटक!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Puja Khedkar Case : पूजा खेडकरला हायकोर्टाचा झटका, अटकपूर्व जामीन फेटाळला,कधीही होऊ शकते अटक!

Puja Khedkar Case : पूजा खेडकरला हायकोर्टाचा झटका, अटकपूर्व जामीन फेटाळला,कधीही होऊ शकते अटक!

Dec 23, 2024 04:20 PM IST

Puja Khedkar Case : नागरी सेवा परीक्षेत फसवणूक आणि ओबीसी व अपंग कोट्यातील लाभाचा गैरवापर केल्याप्रकरणी पूजा खेडकर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यात त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.

पूजा खेडकर
पूजा खेडकर

Puja Khedkar Case : न्यायालयाने माजी आयएएस प्रोबेशनर पूजा खेडकर यांच्या अटकेचा मार्ग मोकळा केला आहे. नागरी सेवा परीक्षेत फसवणूक आणि ओबीसी व अपंग कोट्यातील लाभाचा गैरवापर केल्याप्रकरणी खेडकर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यात त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्राधारी सिंह यांनी या याचिकेवर निर्णय देताना सांगितले की, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला जातो. तसेच, अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण काढून घेण्यात आले आहे. न्यायमूर्ती सिंह म्हणाले की, खेडकर यांच्याविरोधात प्रथमदर्शनी भक्कम खटला आहे. अशा परिस्थितीत या कटाचा शोध घेण्यासाठी चौकशीची गरज आहे. न्यायाधीश म्हणाले की, घटनात्मक संस्था तसेच समाजाची फसवणूक करण्याचे हे दुर्मिळ प्रकरण आहे.

पूजा खेडकर यांनी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२२ साठी केलेल्या अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांचे वकील आणि तक्रारदार संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जाला विरोध केला. यूपीएससीच्या वतीने वरिष्ठ वकील नरेश कौशिक आणि वकील वर्धमान कौशिक यांनी न्यायालयात बाजू मांडली.

यूपीएससीने जुलै महिन्यात खेडकर यांच्यावर अनेक कारवाई सुरू केल्या. यात बनावट ओळख दाखवून नागरी सेवा परीक्षेत अधिक प्रयत्न केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचाही समावेश होता. दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अपंग हक्क कायद्यातील तरतुदींनुसार एफआयआर दाखल केला आहे.

पूजा खेडकर यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

काय आहे प्रकरण-

फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर यावर्षी जुलै महिन्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा-२०२२च्या माध्यमातून तात्पुरती शिफारस केलेली उमेदवार पूजा दिलीप खेडकर हिची उमेदवारी तात्पुरती रद्द होती. त्याबरोबरच तिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीतून कायमचे बाद केले होते.

सुरुवातीला पूजाची पुण्यातून वाशिम येथे बदली झाली होती. त्यानंतर प्रशिक्षण संस्थेने तिचं ट्रेनिंग थांबवलं होतं. पुढे यूपीएससीने तिच्यावर नाव बदलून परीक्षा दिल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंद केला होता.त्यानंतर यूपीएससीने तिचं आयएएस पद रद्द ठरवून न्यायालयात खटला दाखल केला होता. खेडकरने आयएएस पद मिळवण्यासाठी अनेक कारनामे केले होते. तिने एक-दोन नव्हे तर तब्बल तीन दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती पुढे आली होती.तसेच यूपीएससी परीक्षेच्या जास्त संधी मिळाव्यात, यासाठी नाव बदलून परीक्षा दिल्या होत्या.

ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पूजाने आई-वडिलांपासून वेगळं राहात असल्याचा बनाव करुन खोटी कागदपत्रं दाखल केल्याचेही समोर आले आहे. वास्तविक पूजाच्या कुटुंबाकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे निष्पन्न झालं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर