मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  देहू, आळंदी व चाकण मिळून नवीन महानगरपालिका स्थापन होणार!

देहू, आळंदी व चाकण मिळून नवीन महानगरपालिका स्थापन होणार!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 12, 2024 07:31 PM IST

पुणे शहरालगतच्या देहू,आळंदी,चाकण,राजगुरूनगर मिळून एक महानगरपालिका करता येईल का, याबाबत विचार सुरूअसल्याचेअजित पवार म्हणालेत.

ajit pawar
ajit pawar

शहराशेजारच्या गावांत  बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यांचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे व्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका असणे आवश्यक आहे. त्यामुळे पुणे शहरालगतच्या देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून एक महानगरपालिका करता येईल का, याबाबत विचार सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री व पिण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोहगाव येथे लोहगाव- वाघोली समान पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, धानोरी सर्वे नं. ७ येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले की, लोहगावच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील. संरक्षण विभागाच्या हद्दीत असलेला रस्ता बाहेरुन काढून घेतल्यास येथील विमानतळाचे विस्तारीकरण करून मोठी आंतरराष्ट्रीय विमाने उतरू शकतील. कोणत्याही विकास प्रकल्पांना जागा आवश्यक असते.  जागेच्या मूल्यांकनाबाबत काही अडचणी असल्यास नोंदणी विभागाशी बोलून मार्ग काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पाण्याच्या समस्येबाबत अजित पवार म्हणाले की, पुण्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रोजगाराच्या शोधात लोक येतात. त्यांना पाणी, आरोग्य,  निवारा आदी सुविधा पुरवाव्या लागतात. त्यामुळे इंदापूर, हवेली, दौंड, पुरंदर तालुक्यातील शेतीला पाणी कमी पडत आहे. पाणी बचतीसाठी कालव्याऐवजी बोगदा करण्याचे नियोजन आहे. पुण्याच्या पाण्यासह, शेतीला पाणी मिळावे म्हणून टाटाच्या धरणातून पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वापरलेले सांडपाणी प्रक्रिया करून शेतीला देण्यायोग्य करण्यासाठी आवश्यक तेथे एसटीपी उभारण्यात येथील.

WhatsApp channel