चीन, पाकिस्तानचं टेंशन वाढलं! युद्धसज्जतेसाठी संरक्षण बजेटमध्ये ९.५ टक्क्यांनी केली वाढ
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  चीन, पाकिस्तानचं टेंशन वाढलं! युद्धसज्जतेसाठी संरक्षण बजेटमध्ये ९.५ टक्क्यांनी केली वाढ

चीन, पाकिस्तानचं टेंशन वाढलं! युद्धसज्जतेसाठी संरक्षण बजेटमध्ये ९.५ टक्क्यांनी केली वाढ

Feb 02, 2025 08:15 AM IST

Defence Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी २०२५-२६ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्पांत संरक्षण क्षेत्रासाठी ६.८१ लाख कोटींची तरतूद केली. ही तरतूद गेल्यावेळीपेक्षा जास्त आहे. यंदा भारत सरकारने संरक्षण बजेटमध्ये ३६ हजार ९५९ कोटींची वाढ केली आहे.

चीन, पाकिस्तानचं टेंशन वाढलं! युद्धसज्जतेसाठी संरक्षण बजेटमध्ये ९.५ टक्क्यांनी वाढ
चीन, पाकिस्तानचं टेंशन वाढलं! युद्धसज्जतेसाठी संरक्षण बजेटमध्ये ९.५ टक्क्यांनी वाढ

Defence Budget 2025 : भारतासमोरील अंतर्गत आणि बाहिर्गत आव्हाने पाहता यंदाच्या अर्थसंकल्पत  संरक्षण बजेटमध्ये भरीव तरतूद करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी गेल्या बजेटच्या तुलनेत जवळपास १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.  २०२५-२६ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्पांत संरक्षण क्षेत्रासाठी ६.८१ लाख कोटींची तरतूद केली. ही तरतूद गेल्यावेळीपेक्षा जास्त आहे. यंदा भारत सरकारने संरक्षण बजेटमध्ये ३६ हजार ९५९ कोटींची वाढ केली आहे.

संरक्षण बजेटमध्ये सुमारे ६० हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाला यावेळी ६.८१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात गेल्या वेळेच्या तुलनेत ९.५३ टक्के वाढ झाली आहे. मात्र, ही वाढ जीडीपीच्या केवळ १.९१ टक्क्यांच्या जवळपास असल्याने ही वाढ कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. चालू आर्थिक वर्षात संरक्षण क्षेत्रासाठी ६.२१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी १.७२ लाख कोटी रुपये संरक्षण आधुनिकीकरणासाठी आहेत. म्हणजेच ही रक्कम संरक्षण उपकरणांच्या खरेदीसाठी आहे. नवे आर्थिक वर्ष सुरू होण्यास  अवघे दोन महिने शिल्लक असले तरी लष्कराच्या आधुनिकीकरणावर १३ हजार ५०० कोटी रुपये खर्च झालेले नाहीत. सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात याचे प्रतिबिंब उमटले आहे.

या अर्थसंकल्पात संरक्षण आधुनिकीकरणासाठी १.८० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नव्या आर्थिक वर्षात प्रीडेटर ड्रोन, जीई इंजिन आदींची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक बजेटची गरज भासू लागली. मात्र, त्या हिशोबानुसार हा अर्थसंकल्प अजूनही कमीच असल्याचं मानलं जात आहे.  आधुनिकीकरण अर्थसंकल्पात देशांतर्गत खरेदीसाठी १ लाख १२ हजार ांची तरतूद करण्यात आली आहे.

संरक्षण अर्थसंकल्पाचे तीन प्रमुख भाग 

संरक्षण अर्थसंकल्पात प्रामुख्याने तीन भाग असतात. एक म्हणजे आधुनिकीकरण, दुसरं पेन्शन आणि तिसरं म्हणजे संरक्षण सेवा चालवणं. पेन्शन बजेटमध्येही यंदा मोठी वाढ करण्यात आली असून, ती १.६० लाख कोटींवर पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्षात तो १.४१ लाख कोटी होता. अर्थसंकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ४.९१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तटरक्षक दलाच्या बजेटमध्येही लक्षणीय वाढ करण्यात आली असून त्यासाठी ९ हजार ६४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सीमा रस्ते संघटनेला (बीआरओ) ७१.४६ कोटी ंची तरतूद करण्यात आली आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या आयडीईएक्स योजनेसाठी ४४९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आले आहेत. यातील डिफेन्स स्टार्टअप्सना इनोव्हेशनसाठी निधी दिला जातो. देशात संरक्षण उत्पादनांचे उत्पादन वाढावे आणि परदेशातून संरक्षण उपकरणांची आयात कमी व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

संरक्षण क्षेत्रासाठी ६.८१ लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ६.२२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. भांडवली खर्चासाठी करण्यात आलेल्या तरतुदीमध्ये ४८,६१४ कोटी रुपये लढाऊ विमानांसाठी आणि एअरो इंजिनसाठी, तर २४,३९० कोटी रुपये नौदलासाठी आहेत. ६३ हजार ०९९ कोटी रुपयांची रक्कम इतर साहित्याच्या खरेदीसाठी ठेवण्यात आली आहे. नौदलाच्या गोदीमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी ४,५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गेल्या पाच वर्षांचा संरक्षण अर्थसंकल्प

२०२५-२६ मध्ये ६.८१ लाख कोटी

२०२४-२५ मध्ये ६.२२ लाख कोटी

२०२३-२४ मध्ये ५.९४ लाख कोटी

२०२२-२३ मध्ये ५.२५ लाख कोटी

२०२१-२२ मध्ये ५.७८ लाख कोटी

 

 

Whats_app_banner