Deepseek : ओपन एआय, चॅट जीपीटी विसरा! डीपसीकच्या चिनी चॅटबॉटची एआय विश्वात खळबळ, दिग्गज कंपन्यांचं वाढलं टेन्शन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Deepseek : ओपन एआय, चॅट जीपीटी विसरा! डीपसीकच्या चिनी चॅटबॉटची एआय विश्वात खळबळ, दिग्गज कंपन्यांचं वाढलं टेन्शन

Deepseek : ओपन एआय, चॅट जीपीटी विसरा! डीपसीकच्या चिनी चॅटबॉटची एआय विश्वात खळबळ, दिग्गज कंपन्यांचं वाढलं टेन्शन

Jan 28, 2025 09:41 AM IST

China DeepSeek AI : चीनी डीपसीकने एआय विश्वात खळबळ उडवून दिली आहे. डीपसेक-व्ही ३ हे अमेरिकेतील प्रतिस्पर्धी चॅटजीपीटीला देखील मागे टाकत अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर टॉप-रेटेड फ्री अ‍ॅप्लिकेशन बनले आहे.

ओपन एआय, चॅट जीपीटी विसरा! चीनी डीपसीकने एआय विश्वात उडवली खळबळ, मोठ्या टेक कंपन्यांचं वाढलं  टेन्शन
ओपन एआय, चॅट जीपीटी विसरा! चीनी डीपसीकने एआय विश्वात उडवली खळबळ, मोठ्या टेक कंपन्यांचं वाढलं टेन्शन

China DeepSeek AI : चीनच्या स्टार्टअप डीपसीकने एआय मॉडेल्ससह तंत्रज्ञानाच्या जगात खळबळ उडवून दिली आहे. डीपसीकमुळे मोठ्या टेक कंपण्यांचं टेंशन वाढलं आहे. डीपसीक एआय चॅट जीपीटी पेक्षाची वरचढ ठरले आहे. डीपसेक-व्ही ३ हे अमेरिकेतील प्रतिस्पर्धी चॅटजीपीटीला देखील मागे टाकत अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर टॉप-रेटेड फ्री अ‍ॅप्लिकेशन बनले आहे.

अमेरिकेतील कोणत्याही एआय मॉडेलच्या पेक्षाची चांगली सेवा डीपसीक देत आहे. हे एआय अ‍ॅप खूप कमी खर्चात तयार करण्यात आले आहे.  कंपनीने गेल्या महिन्यात ग्लोबल एआय सर्कलचं लक्ष वेधलं आहे.  डीपसीक-व्ही ३ ला ६ दशलक्ष डॉलर्सपेक्षा कमी किंमतीच्या एनव्हीडिया एच ८००  चिप्सपासून संगणकीय शक्ती देण्यात आली आहे. या अ‍ॅपच्या साह्याने प्रोग्रामिंग आणि विविध माहिती काही क्षणात यूझर्स मिळवत आहेत.  

अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध टॉप-रेटेड फ्री अ‍ॅप्लिकेशन डीपसीक-व्ही ३ द्वारे संचालित, 
डीपसीकचे एआय असिस्टंट अमेरिकेतील प्रतिस्पर्धी चॅटजीपीटीला मागे टाकत अ‍ॅपपल अ‍ॅपप स्टोअरवर उपलब्ध असलेले टॉप-रेटेड विनामूल्य अ‍ॅप बनले आहे. अमेरिकेतील काही टेक कंपन्यांनी अब्जावधी डॉलर्सची एआय गुंतवणूक करून देखील चीनने अमेरिकन कंपन्यांना मात दिली आहे. याचा परिणाम या बड्या कंपन्यांच्या शेअरवर देखील झाला आहे.  एनव्हीडियासह अनेक बड्या टेक कंपन्यांच्या समभागांवरही देखील परिणाम झाला आहे.

२०२२ च्या अखेरीस ओपनएआयच्या चॅटजीपीटीमुळे चिनी तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये खळबळ उडाली होती. यानंतर चिनी कंपन्यांनी एआयवर चालणारे स्वत:चे चॅटबॉट तयार करण्यात सुरुवात केली. चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी चीनी कंपनी बायडूने पहिला चॅटबॉट लाँच केला असला तरी अमेरिकेतील एआय चॅटबॉटच्या क्षमतेमुळे त्यांचे अ‍ॅप टिकू शकले नाही. यामुळे चीनमधील युजर्सची व चीनी कंपन्यांची देखील निराशा झाली. मात्र, सध्या चीनच्या  डीपसीकने अमेरिकन टेक कंपन्यांना देखील मोठा धक्का दिला आहे.  

ओपनएआय आणि मेटाच्या सर्वात प्रगत मॉडेल्सच्या बरोबरीने चिनी स्टार्ट कंपनीने डीपसीक एआय मॉडेल तयार केले. जगप्रसिद्ध  सिलिकॉन व्हॅलीचे अधिकारी व  अमेरिकन टेक कंपनीच्या अभियंत्यांनी देखील या नव्या एआय डीपसीक मॉडेल्सचे कौतुक केलं आहे.  डीपसेक-व्ही ३ आणि डीपसेक-आर १ . हे दोन्ही अ‍ॅप ओपनएआय आणि मेटाच्या सर्वात प्रगत अ‍ॅपच्या तुल्यबळ आहे.  डीपसेकची दोन्ही मॉडेल्स वापरण्यास सोपे असून ते फ्री असल्याचे डीपसीक तयार करणाऱ्या  स्टार्टअपने म्हटलं आहे.  गेल्या आठवड्यात लाँच करण्यात आलेल्या डीपसेक-आर १  चा वापर  हा ओपनएआयच्या ओ १  मॉडेलपेक्षा २०  ते ५०  पट स्वस्त आहे.   स्केल एआयचे सीईओ अलेक्झांडर वांग यांनी गुरुवारी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत डीपसीककडे ५०,००० एनव्हीडिया एच १०० चिप्स असल्याचे सांगितले.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर