मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संजय राऊतांबाबत ईडीचं 'टायमिंग' चुकलेलं नाही: शिंदे गट

संजय राऊतांबाबत ईडीचं 'टायमिंग' चुकलेलं नाही: शिंदे गट

HT Marathi Desk HT Marathi
Jun 27, 2022 02:00 PM IST

गुवाहाटीत मुक्कामी असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ईडीच्या या समन्सवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध ईडीने आज नोटिस पाठवली आहे. संजय राऊत यांनी ईडीने पाठवलेल्या नोटिशीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीला जाणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गुवाहाटीत मुक्कामी असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ईडीच्या या समन्सवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

केसरकर म्हणाले, ‘संजय राऊत यांचं ईडीचं प्रकरण जुनंच आहे. संजय राऊत हे कुणावर तरी टीका करतात आणि त्यानंतर मलम लावतात. खरं तर संजय राऊत यांचं टायमिंग चुकलं, ईडीचं टायमिंग चुकलं असं म्हणता येणार नाही. संजय राऊत यांच्याविरुद्धची ईडीची केस ही कायद्याप्रमाणे चालूच राहणार.’ अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी व्यक्त केली आहे.

 

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या