अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. यावेळी देशभरातील दिग्गज नेते व उद्योगपती उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी एक मराठमोळा व्यक्तीही उपस्थित होता. राज्यातील समाजिक कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असलेल्या दिलीप म्हस्के डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी म्हस्के यांनी जागतिक नेत्यांसोबत सामाजिक, तांत्रिक आणि आर्थिक यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.
दिलीप म्हस्के हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, ते अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांशी संबंधित आहेत. त्यांनी 1995 साली Foundation For Human Horizon ची स्थापना केली, जी आज संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम करते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाला जगातील अनेक प्रभावशाली व्यक्ती आणि नेते उपस्थित होते. म्हस्के यांनी या नेत्यांसोबत व्यक्तिगत संवाद साधत जागतिक विकासासाठी त्यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यामध्ये Amazon चे संस्थापक जेफ बेजोस यांच्याशी चर्चा करून, ई-कॉमर्सद्वारे ग्रामीण विकासाला चालना देण्याबाबत आणि भारतातील डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवण्यासाठी Amazon सारख्या कंपन्यांच्या सहकार्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. त्याचबरोबर मार्क झुकेरबर्ग यांच्याशी Meta च्या आभासी तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी कसा करता येईल, यावर चर्चा झाली. झुकेरबर्ग यांनी म्हस्के यांच्या अफ्रिका प्रकल्पाबाबत कौतुक व्यक्त केले.
टेसला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये म्हस्के यांनी भारतात ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्यासाठी तर Alphabet चे सह-संस्थापकसर्गे सर्गे ब्रिन यांच्यासोबत म्हस्के यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग शिक्षणासाठी कसा करता येईल, यावर सविस्तर चर्चा केली. त्याचसोबत भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी, फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड आर्नॉल्ट, OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन आणि रुपर्ट मर्डोक यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
संबंधित बातम्या