Chakan News : चाकण येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे चाकणकर हळहळले आहे. येथे घरच्या छतावर खेळत असतांना विजेचा शॉक लागल्याने एका चिमूकल्याचा मृत्यू झाला. तर त्याला वाचवतांना आईला देखील शॉक लागल्याने तिचा देखील जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास खराबवाडी येथे घडली.
पल्लवी जाजू असे मृत आईचे तर समर्थ जाजू (वय १४) मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील खराबवाडी येथे जाजू कुटुंब राहतात. मंगळवारी ६ च्या सुमारास पल्लवी जाजू या टेरेसवर स्वच्छता करण्यासाठी गेल्या होत्या. तर, त्यांचा मुलगा देखील हा त्यांच्या सोबत टेरेसवर गेला होता. छत्रावर जिन्यातून पाणी आत येऊ नये म्हणून पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. या पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. येथे लोखंडी अँगलमधून तार लोंबकळत होती. या तारेतूनच विद्युत प्रवाह या लोखंडी पत्रात उतरला होता. दरम्यान, या पत्र्याला सर्मथचा हात लागला. त्याला जोरदार करंट लागला. समर्थ यामुळे जागीच कोसळला. दरम्यान, त्याला वाचवण्यासाठी त्याची आई पल्लवी देखील धावली. तिला देखील जोरदार करंट लागल्याने ती देखील जागीच कोसळली.
या घटनेची माहिती कळताच घरच्यांनी आधी विद्युत प्रवाह बंद केला. यानंतर दोघांनाही तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तर आई आणि मुलाच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे नागरिक देखील हळहळले आहेत.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज पुणे पोलिसांकडून बाल न्याय मंडळात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या अर्जामुळे आरोपी अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या