nandigram express suicide : नंदीग्राम एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या; दादर स्थानकातील घटना-dead body found in nandigram express in dadar railway station mumbai crime news ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  nandigram express suicide : नंदीग्राम एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या; दादर स्थानकातील घटना

nandigram express suicide : नंदीग्राम एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या; दादर स्थानकातील घटना

Aug 10, 2024 09:26 AM IST

nandigram express suicide news : दादर स्थानकावर नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये एका व्यक्तीने स्वच्छतागृहात मफलरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नंदीग्राम एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या; दादर स्थानकावरील घटना
नंदीग्राम एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या; दादर स्थानकावरील घटना

nandigram express suicide news : काही दिवसांपूर्वी दादर रेल्वे स्थानकावर तुतारी एक्सप्रेसमध्ये सुटकेसमध्ये कोंबलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. ही घटना ताजी असतांना, आता आणखी एक घटना उघडकीस आली आहे. दादर स्थानकावर उभ्या असलेल्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात एका व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदीग्राम एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मृतव्यक्तीने एक्सप्रेस मधील स्वच्छता गृहात मफलरच्या साह्याने गळफास घेतला होत. त्याचा मृतदेह काढून तो दावखण्यात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

पोलिस तपासात हा मृतव्यक्ति मूळचा घाटकोपर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याच्यावर एक छेडछाडीचा गुन्हा दाखल होता. त्यामुळे तो फरार होता. या गुन्ह्यामुळे तो मानसिक तणावात होता अशी माहिती आहे. याच तणावातून त्याने आमहत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळा पासून पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. दरम्यान, दादर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

तुतारी एक्सप्रेसमध्ये सुटकेसमध्ये आढळला होता मृतदेह

गेल्या सोमवारी दादर रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेसमध्ये एका ट्रॉली बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह आढळला होता. पोलिसांना आलेल्या संशयातून याचा उलगडा झाला होता. पोलिसांनी मुकबधिर आरोपी जय चावडा व शिवजीत सिंग या दोघांना अटक केली होती. या दोघांनी अर्शद अली सादीक अली शेख याची हत्या करत त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी हे तुतारी एक्सप्रेसने कोकणात जात होते. रेल्वे पोलिसांना दोघांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांची बॅग तपासली. यावेळी त्यांना धक्का बसला. त्यांनी बॅगची झडती घेतली असता त्यात रक्ताने माखलेला अर्शदचा मृतदेह आढळून आला. हे तिघेही मित्र होते. त्यांनी हा खून प्रेम प्रकरणातून केल्याचे तपासात उघड झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील पोलिसांना मिळाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

विभाग