मुंबईत गोराईच्या जंगलात सापडला तुकडे केलेला मृतदेह! प्लास्टिकच्या डब्यांमध्ये भरलं होतं डोकं, हात-पाय आणि धड
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईत गोराईच्या जंगलात सापडला तुकडे केलेला मृतदेह! प्लास्टिकच्या डब्यांमध्ये भरलं होतं डोकं, हात-पाय आणि धड

मुंबईत गोराईच्या जंगलात सापडला तुकडे केलेला मृतदेह! प्लास्टिकच्या डब्यांमध्ये भरलं होतं डोकं, हात-पाय आणि धड

Nov 11, 2024 10:52 AM IST

Mumbai Gorai Murder : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोराई परिसरात गोणीत तुकडे करून भरलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल सात तुकडे करून प्लॅस्टिकच्या डब्यात टाकून गोणीत भरून फेकण्यात आले.

गोराईच्या जंगलात सापडला तुकडे केलेला मृतदेह! डोकं, हात-पाय, धड प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरून फेकले
गोराईच्या जंगलात सापडला तुकडे केलेला मृतदेह! डोकं, हात-पाय, धड प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरून फेकले

Mumbai Gorai Murder : मुंबईत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पश्चिम उपनगरातील गोराई येथील जंगलात एका पोत्यात तब्बल सात तुकडे असलेला मृतदेह सापडला आहे. हे तुकडे प्लॅस्टिकच्या डब्यात टाकून पोत्यात भरून फेकण्यात आले आहे. पोत्यात हात, पाय, डोके आणि धड वेगवेगळे भरण्यात आले आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा आहे याची माहिती मिळू शकली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोराई येथील बाबर पाडा येथे महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाचे जंगल आहे. या जंगलात झाडा झुडपात एक पोते सापडले. या पोत्यात डोके, हात-पाय, धड असे तब्बल ७ तुकडे आढळले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या ठिकाणी फॉरेन्सिक विभागाचे पथक देखील झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे. हा खून अत्यंत निर्घृणपणे करण्यात आले आहे. हा खून का करण्यात आला याचा पोलिस तपास करत आहेत.

गोराईच्या बाबर पाडा येथील पिक्सी रिसॉर्टला जाणाऱ्या मार्गावरील शेफाली गावाजवळ हे पोते सापडले असून हा मृतदेह कोणाला सापडू नये झुडपात हे पोते लपवण्यात आले होते. हा मृतदेह कुजल्यामुळे मोठी दुर्गंधी पसरली होती. दुर्गंधी कोठून येत आहे याचा नागरिकांनी शोध घेतला. यावेळी जंगलात झुडपात एक पोते त्यांना आढळले. यात हा मृतदेह आढळल्याने स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी हे पोते उघडले तेव्हा त्यात काही प्लॅस्टिकच्या डब्यात मृतदेहांचे विविध अवयव भरले असल्याचे आढळले. याप्रकरणी गोराई पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोणीत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ही हत्या का केली, हा व्यक्ति कोण आहे अशा विविध प्रश्नांचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तपास पथके तयार केली आहे.

पुण्यात सापडला होता कुत्र्यांनी खाल्लेला अर्धवट मृतदेह

पुण्यात रविवारी येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील डोके, धड, हात, पाय कुत्र्यांनी खाल्लेला एका व्यक्तिचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाचा कमरे खालचा काही भाग फक्त शिल्लक राहिला होता. येथील न्याती बिल्डिंग समोरील झाडाझुडपात हा मृतदेह सापडला. मृतदेहाची कवटी आणि वरील भाग कुत्र्यांनी पूर्णपणे खाल्ला होता.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर