Yavatmal Two Dead bodies News: यवतमाळ शहरालगतच्या नागपूर बायपासवर रेल्वे पुलाखालील नाल्यात दोन अल्पवयीन मुलांची मृतदेह आढळले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांची चेहरा ओळख पटली. परंतु, त्यांची नावे अद्याप समजू शकलेली पटलेली नाही. परंतु, हे दोन्ही मुले कचरा वेचण्याचे काम करायचे, असे पोलीस चौकशीत समजले. दोन्ही मुलांचा मृत्यू अपघात की घातपात, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,दोन्ही मुले ११ ते १२ वयोगटातील असून ते वडगाव मोक्षधाम परिसरात भाड्याने राहत होते. ते दररोज कचरा वेचण्यासाठी घराबाहेर पडायचे. कधी-कधी दोन- दोन दिवस घरी परतत नव्हते. त्यांचे आई- वडीलही मोलमजुरी करायचे. त्यामुळे त्यांनाही मुलांवर लक्ष देता येत नव्हते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बंगळुरूपासून सुमारे ७० किमी अंतरावर असलेल्या तुमकुरु शहराच्या बाहेरील तलावाच्या तळाशी एका जळालेल्या कारमध्ये ३ अज्ञात लोकांची मृतदेह आढळली. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. कारमध्ये सापडलेल्या जळालेल्या मृतदेहांची ओळख पटवणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही. ही घटना कशी घडली, त्याची चौकशी सुरू आहे. हे खुनाचे प्रकरण असू शकते, असा संशय पोलिसांना आहे.