Navi Mumbai : नवी मुंबईत एका घरात आढळला आई आणि मुलाचा मृतदेह; हत्येचा संशय, परिसरात खळबळ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai : नवी मुंबईत एका घरात आढळला आई आणि मुलाचा मृतदेह; हत्येचा संशय, परिसरात खळबळ

Navi Mumbai : नवी मुंबईत एका घरात आढळला आई आणि मुलाचा मृतदेह; हत्येचा संशय, परिसरात खळबळ

Jan 01, 2025 10:43 PM IST

Navi mumbai News : कामोठे सेक्टर६मधील ड्रीम्ज अपार्टमेंटमध्ये आई व मुलाचा मृतदेह आढळला आहे. मुलाच्या अंगावर मारहाण केल्याच्या खुणा असल्याने दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नवी मुंबईत घरात आढळला आई आणि मुलाचा मृतदेह
नवी मुंबईत घरात आढळला आई आणि मुलाचा मृतदेह

नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील कामोठ्यात एका इमारतीत आई व मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे.  कामोठे सेक्टर ६ मधील ड्रीम्ज अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे. मुलाच्या अंगावर मारहाण केल्याच्या खुणा असल्याने दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर पोलिसांना खोलीत प्रवेश केल्यानंतर एलपीजी गॅस लिक असल्याचेही समोर आले आहे.  आहे. या अपार्टमेंटमध्ये एका घरात आई आणि मुलाची बॅाडी आढळून आली आहे. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले असून मायलेकाची हत्या की आत्महत्या याचा तपास केला जात आहे.

दरम्यान पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबई मधील कामोठे येथील सेक्टर ६ येथीस ड्रीम्ज अपार्टमेंटमध्ये दोन मृतदेह आढळले आहेत. घरात माय लेकाचा मृतदेह आढळला आहे. मुलाच्या अंगावर मारहाणीत व्रण उठले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता घरातील एलपीजी गॅस सिलिंडर लिक असल्याचे दिसून आले. दरम्यान पोलिसांनी दोन्ही मृतदेह हे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांकडून सोसायटीचे सीसीटीव्ही चेक करण्यास सुरवात करण्यात आली आहे.

कर्तव्यावरील पोलीस निरीक्षकांचा अपघाती मृत्यू

नववर्षानिमित्त बंदोबस्तावर असतांना काम संपवून घरी जाणाऱ्या एका पिंपरीचिंचवड येथील एका पोलिस निरीक्षकांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव वेगातील पोलिस कार ही कंटेनरला पाठीमागून धडकल्याने पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. जितेंद्र गिरनार हे नवीन वर्षानिमित्त बंदोबस्तावर होते. रात्रपाळी करून घरी परतत असताना त्यांची कार पाठीमागून एका कंटेनरवर आदळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर कारचा चक्काचूर झाला आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर