मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत - देवेंद्र फडणवीस

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 27, 2024 05:29 PM IST

Devendra Fadanavis on Marataha Reservation : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला आहे, पण यात घर जाळणे,थेट हल्ला करणे, हे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाहीत, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

शिंदे सरकारने मराठा आरक्षणावर तोडगा काढत मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश जारी केला आहे. मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या शिंदे सरकारने मान्य केल्या असून मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी मनोज जरांगे यांचं अभिनंदन करताना ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय केला नसल्याचे म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला आहे, पण यात घर जाळणे, थेट हल्ला करणे, हे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाहीत. इतर आंदोलन गुन्हे मागे घेऊ.

महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यापासून सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन आज संपले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज (शनिवार) आंदोलन संपल्याची घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले आहे. महाराष्ट्र सरकारने जरांगेंच्या मागणीनुसार नवीन अध्यादेश दिला आहे.

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी आधीपासूनच सांगत होतो की कायदेशीररीत्या आरक्षण द्यावे लागेल. हा मार्ग मनोज जरांगेंनी स्विकारला आहे. सरसकट आपल्याला करता येणार नाही. मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील लोकांना आपल्याला प्रमाणपत्र देता येईल. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे देखील आदेश आहेत.

क्युरिटीव्ह पिटीशन आणि सर्व्हे या दोन्ही बाबी सुरु आहेत. मराठा मोठा समाज आहे. सर्वेक्षण सुरु आहे. क्युरेटिव्हमध्ये मार्ग निघाला नाही. तर दुसरा मार्ग सर्वेक्षण सुरुच आहे. मागच्या वेळेला न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवल्या होत्या. त्या सर्व्हेमधून दूर करण्याचे प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

WhatsApp channel