Devendra Fadnavis : आता आदेशाची वाट पाहू नका! थेट मैदानात उतरा अन् ठोकून काढा! फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : आता आदेशाची वाट पाहू नका! थेट मैदानात उतरा अन् ठोकून काढा! फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश

Devendra Fadnavis : आता आदेशाची वाट पाहू नका! थेट मैदानात उतरा अन् ठोकून काढा! फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश

Published Jul 21, 2024 03:15 PM IST

Devendra Fadnavis : पुण्यातील भाजप चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. या सोबतच मैदानात उतरून थेट लढण्याचे आदेश देखील त्यांनी करकर्त्यांना दिले.

आता आदेशाची वाट पाहू नका! थेट मैदानात उतरा अन् ठोकून काढा! फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश
आता आदेशाची वाट पाहू नका! थेट मैदानात उतरा अन् ठोकून काढा! फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश

Devendra Fadanvis news: पुण्यात आज भाजप महाराष्ट्र प्रदेशचे चिंतन शिबिर सुरू आहे. बालेवाडी येथे सुरू असलेल्या या शिबिरात भाजपचे बडे नेते उपस्थित आहेत. या अधिवेशात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच कार्यकर्त्यांना घेत मैदानात उतरून लढण्याचे आदेश दिले आहेत. फडणवीस म्हणाले, आपले लोक उत्तर देत नाहीत आदेशाची वाट बघतात, मी आज आदेश देतो फुल बॅटिंग करा. मैदानात उतरून लढा.

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा फटका बसला. त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार रणनीती आखली आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी भाजपं मास्टर प्लॅन तयार केला आहे. आज पुण्यात सुरू असलेल्या भाजपच्या चिंतन शिबिरात राज्यभरातून पाच हजार कार्यकर्ते दाखल झाले आहेत. या सर्वांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबिरात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज विरोधकांवर तूफान फटके बाजी केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक खोटा नरेटिव्ह पसरवतात. विरोधक म्हणतात सिलिंडरच्या किमती वाढल्या. आम्ही २०१३ सालच्या सिलिंडरच्या किमती दाखवल्या. त्या सध्याच्या किमतीपेक्षा जास्त होत्या. या किमती दाखवल्यानंतर ते गप्प बसतात. मी आत्मचिंतन करतोय. आपली एक अडचण आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं. पण प्रत्येकजण आदेशाची वाट पाहतो. आदेश आला तर मी उत्तर देईन. नाहीतर देणार नाही, असे प्रत्येकजण म्हणतो. आज मी तुम्हा सर्वांना परवानगी देतो. ज्याला बॅटिंग करायची आहे, त्याने करावी. मैदानात उतरा. पण अट एकच आहे. हीट विकेट व्हायचं नाही. जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे, सेल्फ गोल करायचा नाही. काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. ते असं काही बोलतात की चार पाच दिवस त्यावरच उत्तर देत बसावे लागते. त्यामुळे आता बाकी आदेश विचारू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा. तुम्हाला खोटं बोलायचंच नाही. खरं बोलायचं आहे. आणि खरं बोलायला विचार करावा लागत नाही. त्यामुळे थेट उत्तर द्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर