मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : 'टार्गेट ठेवणं गैर नाही, पण जनतेच्या...', शिवसेनेच्या निर्धारावर फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis : 'टार्गेट ठेवणं गैर नाही, पण जनतेच्या...', शिवसेनेच्या निर्धारावर फडणवीसांचा टोला

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 04, 2022 07:36 AM IST

Devendra Fadnavis On BMC Elections 2022 : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis On BMC Elections 2022
Devendra Fadnavis On BMC Elections 2022 (Hindustan Times)

Devendra Fadnavis On BMC Elections 2022 : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेत शिवसेना १५० जागा निवडून आणणार असल्याचा दावा केला होता. आता त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेच्या दाव्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बहुमत मिळवणार असल्याचा दावा करण्यात काहीही गैर नाही, पण जनतेच्या मनात काय आहे?, याचंही भान असायला हवं. मुंबई महापालिकेवर भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा करत फडणवीसांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

राणेंच्या निवासस्थानी घेतलं बाप्पांचं दर्शन...

गणेशोत्सव सुरू असल्यानं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांच्या मुंबई महापालिकांच्या निवडणुकीबद्दल आणि अमित शहांच्या मुंबई दौऱ्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज ठाकरेंच्या भेटीवर दिलं स्पष्टीकरण...

देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजप आणि मनसेची युती होणार का?, याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु त्यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले की, आमच्या भेटींमध्ये राजकीय चर्चा होत नाही, चर्चा केवळ सोशल मीडियावरूनच होत आहे.

IPL_Entry_Point