Ajit Pawar news : उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार हे आज सकाळी पुण्यात एका कार्यक्रमाला जात असतांना पहाटे संचेती पूलाखाली एका रिक्षाचा आणि दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. यावेळी अजित पवार यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्त नागरिकाच्या मदतीला धावून गेले.