Chhatrapati Sambhaji Nagar : लोकसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी संभाजी नगर येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल ३९ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेने प्र खळबळ उडाली आहे. या पैशांसोबत पैसे मोजण्याचे मशीन देखील जप्त करण्यात आले आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पहिल्या तीन टप्प्यांचं मतदान पार पडले असून उद्या सोमवारी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. निवडणुकीत अवैध रक्कम आणि दारूचा महापूर वाहत असल्याचा या निवडणुकीत दिसून आले आहे. पैठण गेट परिसरात पोलिसांनी सुमारे ३९ लाख ६५ हजारांची रक्कम जप्त केली आहे. एका मोबाईलच्या दुकानातून ही रक्कम जप्त करण्यात आलीये. या दुकानात वेगवेगळ्या ठिकाणी पैसे लपून ठेवण्यात आले होते. ही रक्कम कुणाची आहे, तसेच कोठून आणली असे दुकानदाराला विचारल्यास या बाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पैठण गेट परिसरात मोबाईल अॅक्ससेसरीच्या दुकानात अवैध रक्कम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. तब्बल १० दिवसांपासून पोलिस या दुकानावर पाळत ठेऊन होते. त्यानंतर या ठिकाणी धाड टाकण्यात आली. या दुकानात मोठी रक्कम आणि पैसे मोजण्याचे मशीन आढळले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा पैसा कोठे नेला जात होता, याची चौकशी केली जात आहे.
राज्यात निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, मतदारांना भुलवण्यासाठी याचा वापर केला जात असल्याचे तपसात पुढे आले आहे. हे गैर प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे ठीक ठिकाणी तपास नाके उभारण्यात आले आहेत. अनेक संशयित वाहनांना थांबवून तपासणी केली जात आहे. बीड येथे देखील तपासणी दरम्यान एक कोटी रुपयांची रक्कम सापडली होती. दरम्यान, संभाजी नगर येथे निवडणुकीच्या एक दिवसापूर्वी मोठी रक्कम सापडल्याने चर्चांना उधाण आले आहे.
संबंधित बातम्या