मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dawood Ibrahim : दाऊदला धक्का! आईच्या नावावरील मालमत्तेचा होणार लिलाव, मुंबके गावातील चार शेतजमिनींसाठी बोली

Dawood Ibrahim : दाऊदला धक्का! आईच्या नावावरील मालमत्तेचा होणार लिलाव, मुंबके गावातील चार शेतजमिनींसाठी बोली

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 02, 2024 02:40 PM IST

Dawood Ibrahim Property Auction : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके गावातील आईच्या नावावर असलेल्या बंगला व आंब्याच्या बागा लिलावात काढण्यात आल्या आहेत.

Dawood Ibrahim (HT File)
Dawood Ibrahim (HT File) (HT_PRINT)

Dawood Ibrahim Property Auction : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमला सरकारने दणका दिला आहे. रत्नागिरी जिल्हयातील खेड तालुक्यातील मुंबके या त्याच्या मुळ गावातील आईच्या नावावर असलेला बंगला आणि काही शेती ही लिलावात काढण्यात आली आहे. दाऊदची आई अमिना बी यांच्या नावावर या मालमत्ता आहेत. शुक्रवारी हा लिलाव होणार आहे. दरम्यान, आता पर्यंत दाऊदच्या ११ मालमत्ता या लिलावात काढण्यात आल्या आहेत.

पुण्यात मध्यरात्री मद्यधुंद तरुणीचा राडा; शेजाऱ्यांसह पोलिसांनाही केली मारहाण, सोसायटीत तोडफोड

दाऊद इब्राहिमचे मुळ गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातिल मुंबके आहे. या ठिकाणी त्याची आई अमिना बी हीच्या नावावर एक बंगला आणि चार शेतजमीनी आहेत. या चारही जमिनी आणि बंगल्याचा लिलाव शनिवारी होणार आहे. या संदर्भातील नोटिस ही गेल्या वर्षी २१ नोव्हेंबर रोजी काढण्यात आली होती.

पत्नीचं दोघांसोबत अफेअर! संतापलेल्या नवऱ्याने तिघांची केली हत्या, पोत्यात सापडले मृतदेह

दाऊद इब्राहिमचे मूळ गाव हे खेड तालुक्यातील मुंबके आहे. या गावात आई अमिना बी हीच्या नावावर बंगला व आंब्याची बाग असून लोटे आणि खेड शहरात देखील त्याच्या मालमत्ता आहेत. मुंबके येथील लिलावात काढण्यात आलेल्या जमिनींची किंमत ही सरकारी बाजार भावानुसार लावण्यात आली आहे. ही जागा २० गुठ्यां पेक्षा जास्त आहे. यातील एक जमिनी ही ९ लाख ४१ हजार २८० किमतीची आहे. तर दुसऱ्या शेतजमिनीची अंदाजे किंमत ही ८ लाख 8 हजार ७७० आहे.

दरम्यान, या पूर्वी देखील सरकारने त्याच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. तब्बल ११ मालमत्तांचा लिलाव या पूर्वी करण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी रत्नागिरीतील खेड तालुक्यातील लोटे येथील दाऊदची मालमत्ता ही १.१० कोटींमध्ये विकण्यात आली होती.

दाऊद इब्राहिम हा भारतातील फरार गँगस्टर आणि दहशतवादी आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटात त्याचा हात होता. यानंतर तो भारतातून फरार होऊन दुबई आणि पाकिस्तानात जाऊन लपला आहे. काही दिवसांपूर्वी कराची येथे त्याच्यावर विषप्रयोग झाल्याची अफवा पसरली होती. त्याच्यावर कराची येथे एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती दिली होती. दरम्यान, दाऊदचा जवळचा हस्तक असलेल्या छोटा शकिलने हे वृत्त फेटाळून दाऊद हा व्यवस्थित असल्याचे म्हटले होते.

WhatsApp channel