मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  काँग्रेसला धक्का! महाराष्ट्रातील दिग्गज नेते व माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूनबाई भाजपमध्ये

काँग्रेसला धक्का! महाराष्ट्रातील दिग्गज नेते व माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूनबाई भाजपमध्ये

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 29, 2024 06:56 PM IST

Archana Patil Chakurkar Join BJP : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नूषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपात जाणार आहेत. अर्चना चाकूरकर यांना शनिवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपात जाणार
डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपात जाणार

भाजपने ४०० पारचे लक्ष्य पार करण्यासाठी बेरजेचे राजकारण करण्यास सुरूवात केली आहे. त्याअंतर्गत अन्य पक्षातील तसेच काँग्रेसमधील अनेक नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यातील अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नूषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपात जाणार आहेत. अर्चना चाकूरकर यांना शनिवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

दरम्यान डॉ. अर्चना पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्तही ठरला आहे. त्यांनी भाजपात जावे यासाठी लातूरमधील काँग्रेसचा स्थानिक गट त्यांच्यावर दबाव टाकत होता.

राज्यातील व मराठवाड्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत अनेक नेते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यात डॉ. अर्चना पाटील यांचे नाव समोर आल्याने काँग्रेसला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच लातूरमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसात विधानसभेचे चित्रही स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे.

काही आठवड्यापूर्वी शिवराज पाटील चाकूरकर यांचे कट्टर समर्थक असलेले माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर अर्जना चाकूरकरही भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता त्यांच्या प्रवेशाची निश्चित तारीख समोर आली आहे. या प्रवेशामुळे लातूर, धाराशीव, व नांदेडमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. या जिल्ह्यातील शिवराज पाटील चाकुरकर यांच्या समर्थकांची ताकद भाजपला मिळणार आहे.

WhatsApp channel