मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Crime : संतापजनक ! भूतबाधेतून मुक्त करण्यासाठी पोटच्या मुलीला जीव जाईपर्यंत मारहाण

Nagpur Crime : संतापजनक ! भूतबाधेतून मुक्त करण्यासाठी पोटच्या मुलीला जीव जाईपर्यंत मारहाण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 07, 2022 12:58 PM IST

नागपूर येथे मुलीला भूतबाधा झाल्याच्या संशयातून आई वडिलांनी आपल्या मुलीला बेल्टने जबर मारहाण केली. या घटनेत ६ वर्षीय चिमूकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नागपुर क्राइम
नागपुर क्राइम (HT_PRINT)

नागपूर: दर्ग्यात नेल्यापासून आपल्या मुलीला भूतबाधेने पछाडले आहे, या संशयातून तिची भूतबाधेतून मुक्तता करण्यासाठी आपल्या पोटच्या ६ वर्षीय मुलीला बेल्टने जबर मारहाण करून तिचा जीव घेतल्याची घटना पुरोगामी महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात उघडकीस आली. एवढेच नाही तर मुलीचा मृतदेह दवाखण्यात सोडून हे नराधम आई वडील पसार झाले. पोलिसांनी या प्रकरणी आई आणि वडिलांसह तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी संदर्भात प्रतापनगर पोलिस स्ठानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिद्धार्थ चिमणे, त्याची पत्नी रंजना चिमणे असे नराधम आई-वडिलांचे नाव आहे. रंजना चिमणे यांच्या बहिनीलाही पोलिसांनी अटक केली आहे. चिमणे दाम्पत्य नागपुरातील नागपूरच्या सुभाष नगर परिसरात राहतात. त्यांना सहा वर्षीय मुलगी होती. काही दिवसंपूर्वी ते एका दर्ग्यात गेले होते. यानंतर ती नेमही आजारी राहत होती. तसेच तिची लक्षणेही बदलली होती. यामुळे तिला भूतबाधा झाली असावी असा संशय चिमणे दाम्पत्याला आला. ते तिला घेऊन एका भोंदू बाबा कडे गेले. यांच्या सांगण्यावरून त्यांनी तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने, शुक्रवारी आणि शनिवारच्या दरम्यानच्या रात्री चिमणे दांपत्य आणि एक महिला नातेवाईक हिच्या उपस्थितीत मुलीच्या अंगतील भूत काढण्यासाठी तिला बेल्ट आणि हाताने जबर मारहाण केली. 

यात मुलीच्या वर्मी मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिची हालचाल होत नसल्याचे पाहून त्यांनी तिला दवाखान्यात नेले. मात्र, तिचा मृत्यू झाला होता. मुलीचा मृत्यू झाल्याने तिघेही घाबरले. त्यांनी भीतीपोटी मुलीचा मृतदेह हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात ठेवून तेथून पळाले. दरम्यान, रुग्णालयाच्या आवारात एका मुलीचा मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी येत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. या ठिकाणचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले तेव्हा या घटनेचा उलगडा झाला. सीसीटीव्हीत आरोपींनी आणलेल्या गाडीचा क्रमांक दिसला. त्यावरून त्यांनी त्यांचा तपास करत तिघांनाही अटक केली.

IPL_Entry_Point

विभाग