Pankaja Munde: नाराजीच्या चर्चेवर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, २०२४ च्या निवडणुकीसाठी केलं आवाहन
Pankaja Munde In Dasara Melava: मेळाव्यामधून होणाऱ्या राजकीय चिखलफेकीबाबतही पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, हा मेळावा चिखल फेकणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा आहे.
Pankaja Munde In Dasara Melava: दसऱ्यानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा भगवानगडावर मेळावा झाला. यामध्ये बोलताना त्यांनी मेळाव्यासाठी आलेल्या लोकांचे आभार मानले. तसंच इथ दाटीवाटीने तुम्ही बसला आहात. खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा किमान चारपट तरी झाला असता. तुम्ही जमिनीवर बसणं गोड मानलं याबद्दल तुमचे आभार मानते अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी भावना व्यक्त केल्या.
ट्रेंडिंग न्यूज
पंकजा मुंडे यांनी नाराजीच्या चर्चेवरही मौन सोडलं. त्यांनी म्हटलं की, माझ्या नाराजीच्या चर्चा बंद करा, कुणीही नाराज नाही. कोणाची अवहेलना, अपमान करू नका. माझी ही इच्छा आहे. इतके दिवस मी मौन बाळगलं कारण माझा तसा स्वभाव नाही. मंत्री असताना मोनिका राजळे आणि इतरांना हाताने जेवण वाढलं. मला त्याचा गर्व नाही तर स्वाभिमान आहे. नाराजीचा विषय माझ्याकडून संपला आहे. ज्यांना मंत्री करायचं ते करतील आपण २०२४ च्या तयारीला लागायला हवं असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
मेळाव्यामधून होणाऱ्या राजकीय चिखलफेकीबाबतही पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, हा मेळावा चिखल फेकणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा आहे. चिखल तुडवणं आणि संघर्ष करणं आमच्या रक्तात आहे. गोपिनाथ मुंडेंचे जे विरोधक होते, ज्यांनी मला विरोध करताना पातळी सोडून टीका केली त्यांच्यावर मी बोलले नाही. मी कधीच कुणावर वैयक्तिक आरोपही केले नाही. कुणी चुकलं तर त्यावर बोलायला संधीचा फायदाही घेतला नाही आणि आमच्या रक्तात ते नाही असंही त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, संघर्ष करो ही घोषणा आता बंद करा. आयुष्यात कुणाला संघर्ष आला नाही? संघर्षाशिवाय नाव होत नाही, कुणाचे जोडे उचलणाऱ्यांचं कधीच इतिहासात नाव झालं नाही. माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती शिवरायांचे संस्कार आहेत. भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचे रक्त आहे. मी संघर्षाला घाबरत नाही आणि थकणार नाही. कधीच कुणासमोर झुकणार नाही.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण सांगताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "गोपीनाथ मुंडेंना संघर्ष नव्हता का? त्यांच्याही वाट्याला कायम संघर्ष आला. प्रवाविरोधात ज्या पक्षात कुणी जात नव्हतं तेव्हा त्या पक्षात गोपीनाथ मुंडे गेले. कमळाचं फुल हातात घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत लढले."
संबंधित बातम्या