मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava : एकनाथ शिंदेंचा उद्धव यांना धक्का.. ठाकरे कुटुंबातील तीन ठाकरे शिंदे गटाच्या गळाला!

Dasara Melava : एकनाथ शिंदेंचा उद्धव यांना धक्का.. ठाकरे कुटुंबातील तीन ठाकरे शिंदे गटाच्या गळाला!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 05, 2022 09:15 PM IST

बीकेसी मैदानात झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात ठाकरे कुटूंबातील तीन सदस्य सामील झाले आहेत.

एकनाथ शिंदेंचा उद्धव यांना धक्का
एकनाथ शिंदेंचा उद्धव यांना धक्का

मुंबई– मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात (Dasara melava) शिंदे व ठाकरे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. बीकेसी मैदानात झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात ठाकरे कुटूंबातील तीन सदस्य सामील झाले आहेत. स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे यांच्या पाठोपाठ जयदेव ठाकरे (Jaydev thackeray) यांनी देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. जयदेव ठाकरे हे थेट बीकेसी मैदानातील व्यासपीठावर पोहोचले आहेत.

बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र जयदेव ठाकरे शिंदे गटात जाण्याआधी स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे हेदेखील बीकेसीच्या मेळाव्यात आले होते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर स्मिता ठाकरे यांची भेट घेतली होती. तर वकील असलेल्या निहार ठाकरे हे सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदेंची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या टीममध्ये आहेत.

बाळासाहेब यांचे दुसरे चिरंजीव जयदेव यांनी तीन लग्न केली. यातील पहिली पत्नी जयश्री कलेकर यांच्यापासून एक मुलगा आहे. जयदीप असं त्यांचं नाव आहे. दुसरी पत्नी स्मिता ठाकरे यांच्यापासून राहुल आणि ऐश्वर्य अशी दोन मुलं आहेत. तर तिसरी पत्नी अनुराधा यांच्यापासून जयदेव यांना माधुरी नावाची एक मुलगी आहे. जयदेव ठाकरे यांना तीन बायकांपासून एकूण चार मुलं आहेत.

निहार ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगतमोठा मुलगा बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांना तीन मुलं होती. त्यापैकी बिंदूमाधव हे थोरले चिरंजीव होते. त्यानंतर जयदेव ठाकरे हे मधले आणि उद्धव ठाकरे हे सर्वात लहान चिरंजीव आहेत.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या