Dasara Melava 2024 : अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान...; उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava 2024 : अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान...; उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

Dasara Melava 2024 : अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान...; उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

Published Oct 12, 2024 10:59 PM IST

Uddhav Thackeray Speech : प्रत्येक राज्यात मंदिर उभारले पाहिजे. केवळ शिवजयंतीला पुतळे पुसायचे एवढ्या पुरते आम्ही मर्यादित नाही. मोदीजी तुम्हाला आणि मिंध्यांना शिवाजी महाराज मतं मिळवणारं यंत्र वाटत असेल. ते काही ईव्हीएम नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

Uddhav Thackeray Dasra Melava 2024 :  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्कवर पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  यांचे गोमुत्रधारी बुरसटलेले हिंदुत्व नको होते म्हणून आम्ही भाजपला लाथ घातली. मिंध्यांना सांगा हे..जाहिरात दिलीय त्यांनी एक...हिंदुत्व आमचा प्राण..अदानी आमची जान व आम्ही शेटजींचे श्वान.. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –

  • जोपर्यंत अदाणींचं सगळे काम होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात आचारसंहिता लागणार नसल्याचं असं मला एका अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. मित्रांना अनेक प्रकल्पांचे वाटप करणं सुरू आहे.
  • ही शिवसेना नाही तर ही वाघनखं आहेत,जी बाळासाहेबांनी मला दिली आहेत.  येवू देत त्यांच्या कितीही पिढ्या,गाढून टाकू त्यांना.  
  • टाटांसारखे उद्योगपती वेगळे असतात. त्यांनी देशाला चव दिली टाटा नमक. आताचे उद्योगपती मिठागरे गिळतायत. मिठागरे गिळणार का जात नाहीत.जे जायला हवेत ते जात नाहीत.  
  • कौरव माजले होते...शकुनीमामा कोण तुम्हाला माहिती आहे. भाजपला आम्ही खांद्यावर घेवून फिरवले..आता भाजपला आम्हाला खांदा द्यायचा आहे. आपल्यासमोरचा तो शत्रू..त्याला ठेचावाच लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले.
  • तिसऱ्यांदा सत्ता देऊन तुम्ही म्हणत असाल हिंदू खतरे में है. त्यामुळे मी म्हणेल काँग्रेसची सत्ता बरी आहे. कारण तेव्हा तुम्ही म्हणत होता इस्लाम खतरे में है.
  • ठाणे जिल्ह्यात शिंदेला गोळी घातली. शिंदेला गोळ्या घालायला पाहिजे होत्या. त्याचा गुन्हाच तसा होता. आनंद दिघे असते तर शिंदेला गोळी घातलीच असती. हा नराधम महिलांवर अत्याचार करतो, महिलांची अब्रू लुटतो, त्याला गोळी घातली बरं झालं. शिंदेला मारायलाच पाहिजे होता. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो. पण तरीही एक प्रश्न आहे. शिंदेला गोळी घातली कारण बाकीच्यांना वाचवायचे असेल. 
  • महाराष्ट्राची ओळख सांगणारी ही लढाई आहे. महाराष्ट्राचं जे वर्णन आहे. मंगल देशा पवित्र देशा राकट देशा कोमल देशा, फुलांच्या देशा… दळभद्र्यांच्या देशा नाही. बुद्धीच्या देशा. हे वर्णन कायम ठेवायचं आहे. लाचार आणि गद्दारांच्या देशा असं करायचं नाही. 
  • आता असं कळलंय की ७० हजार कोटींचा घोटाळा करणारेही लाजून बाहेर पडणार आहेत. त्यांना पण लाज वाटू लागली आहे. असं ऐकलंय. यांचा घोटाळा मोठा आहे. माझा तर काहीच नाही असं त्यांना वाटतंय. असं मी ऐकलंय. अशी बातमी आहे. 
  • धारावीच्या माध्यमातून मुंबईला लुटायचे आहे. हे मी होऊ देणार नाही. सत्तेत आल्यावर आधी हे टेन्डर मी रद्द करेल. रोज माझा महाराष्ट्र लुटला जात आहे. संपूर्ण राज्याची तिजोरी खाली केली. महापालिकेची तिजोरी खाली केली. ही निवडणूक फक्त उद्धव ठाकरे यांची नाहीये.
  • देशाचे सरन्यायाधीश म्हणतात की, इतिहास माझे मुल्यमापन कसे करेल कुणास ठाऊक. चंद्रचूड साहेब अजूनही वेळ गेलेली नाही. लोकशाही वाचवा. तारखे मागे तारखी देऊ नका. भाषणाने निर्णय मिळत नसतो. संपूर्ण देशातील लोकशाही तुमच्याकडे बघते. न्यायदेवतेला अभिमान वाटेल असं काम करा. 
  • मी एक स्वाभिमानी महाराष्ट्र प्रेमी म्हणून शपथ घेतो की, १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र मी लुटारू आणि दरो़डोखोरांच्या हाती जाऊ देणार नाही. मी शपथ घेतो की, छत्रपती शिवराय आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट उभी केली. ती मी अभेद्य ठेवेन. मी शपथ घेतो की महाराष्ट्रात अंधकार घडवणाऱ्या दिल्लीतील शहांना रोखण्यासाठी मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मशाल बनून लढत राहील. मी शपथ घेतो की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत शिवशाही महाराष्ट्रात आणण्यासाठी हीच मशाल धगधगत ठेवेन.
  • ‘गायीला राज्यमातेचा दर्जा दिला. देशी प्रजाती वाचवलीच पाहिजे. पण मला प्रश्न पडला. तर गाय राज्यमाता झाली आहे. मग राज्यभाषा काय आहे. गाईचा हंबरडा राज्यभाषा आहे. मग हा हंबरडा राज्यभाषा असेल तर कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहे. तर तो हंबरडा तुमच्या कानावर का जात नाही. पहिलं आईला वाचवा, मग गायीला वाचवा. हे आमचं हिंदुत्व आहे. 
  • उद्धव ठाकरे म्हणाले की,  अमित शाहा तुमच्या भाजपच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लागली आहे ती बघा. मी नागपूरला गेलो. लोकांनी व्यथा सांगितल्या. सोयाबीनला भाव नाही. संत्र्यावर डिंक्या रोग येतो. कापसाच्या बोंडावर गुलाबी अळी येते. ती जॅकेट घालते की नाही माहीत नाही. अमित शाहजी तुमच्या भाजपच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा लागलाया आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लागली ती बघा. आम्हाला वाईट वाटतं एकेकाळचा आमचा मित्र पोखरला जातो. त्यांना सत्ता पाहिजे. कोणी चालेल पण सत्ता पाहिजे. याला म्हणतात सत्ता जिहाद.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर