मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gautami Patil : डान्सर गौतमी पाटील खासदार उदयनराजेंच्या भेटीला; दिलं खास गिफ्ट

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटील खासदार उदयनराजेंच्या भेटीला; दिलं खास गिफ्ट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 15, 2023 10:49 PM IST

Gautami patil meet udayanraje : गौतमी पाटीलनेखासदार उदयनराजे भोसले यांची त्यांचे साताऱ्यातील निवासस्थान जलमंदिर येथे जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत गौतमीने राजेंना एक खास गिफ्टही दिले.

 गौतमी पाटील  खासदार  उदयनराजेंच्या भेटीला
 गौतमी पाटील खासदार  उदयनराजेंच्या भेटीला

Gautami Patil in satara : राज्यभरात तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरलेल्या व मार्केट जाम करणाऱ्या लावणी डान्सर गौतमी पाटील हिने आज साताऱ्यातील कार्यक्रमाआधी खासदार उदयनराजे भोसले यांची भेच घेतली. गौतमी पाटीलने खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांचे साताऱ्यातील निवासस्थान जलमंदिर येथे जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत गौतमीने राजेंना एक खास गिफ्टही दिले. 

गौतमी पाटीलचा कार्यक्रम आज साताऱ्यात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी गौतमीने उदयनराजेंची भेट घेतली. उदयनराजेंच्या भेटीनंतर गौतमी पाटीलने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, खासदार उदयनराजे यांची आज भेट घेतली. त्यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. महाराजांना मी पहिल्यांदाच भेटले होते. महाराजांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा, यासाठी मी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 

या भेटीत गौतमी पाटीलने खासदार उदयन राजे भोसले यांच्या आवडीचा परफ्युम भेट दिला. यावेळी गौतमी म्हणाली की, राज्यात माझे असंख्य फॅन्स आहेत, मात्र छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा मोठी नाही. माझी बरोबरी त्यांच्याबरोबर नको, असं गौतमीने म्हटलं.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात १२ मे रोजी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बार्शी शहरासह अन्य गावातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तरुणांनी २०० रुपयांचं तिकीट खरेदी करून टाळ्या आणि शिट्यांनी गौतमीचं स्वागत केलं होतं. परंतु रात्री नऊ वाजेच्या सुमारास गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर बार्शी पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यक्रम बंद पाडला होता. हुल्लडबाजी आणि गोंधळ होत असल्यानेच कार्यक्रम बंद केल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. त्यामुळं गौतमीच्या चाहत्यांचा मोठा हिरमोड झाला होता. त्यानंतर पोलिसांनी आयोजक राजेंद्र गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

IPL_Entry_Point